भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती येथील प्रियदर्शनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विश्वकर्मा जयंती व दीक्षांत समारंभ नुकताच साजरा करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्रा. संजय आसेकर संस्थेचे संचालक धनंजय गुंडावार तसेच प्राचार्य प्रवीण बाळ सराफ व्यासपीठावर उपस्थित होते. विश्वकर्मा जयंती व स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष आजादी का अमृत महोत्सव च्या निमित्ताने भारत सरकारच्या सूचनेनुसार ऑगस्ट 22 मध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला.यामध्ये वीजतंत्री या व्यवसायातील प्रथम आरती घोलू तेजावत, द्वितीय महेश गोलू तेजावत व तृतीय प्रज्वल सुखदेव मध्ये मत्ते, डिझेल व्यवसायातील प्रथम ईश्वर मधुकर पारशिवे, द्वितीय तुषार रवींद्र लांडे, तृतीय मोहम्मद जुनेद तसेच जोडारी या व्यवसायातील प्रथम राहुल दिलीप दास, द्वितीय सौरभ सुजित बाला व गौरव विठ्ठल माहुरे यांनी प्राविण्य प्राप्त केले. संस्थेचा निकाल 96% इतका लागला. याप्रसंगी गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला निदेशक काकडे, सर सय्यद सर ,मेघा डोये, आशा राम उपस्थित होते. संचालन मेघा डोये तर आभार काकडे सर यांनी मानले.
प्रियदर्शनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दीक्षांत समारंभ साजरा..!
byChandikaexpress
-
0