प्रशासकीय सेवा महाविद्यालयात रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन..!
भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित कै. निळकंठराव शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय वरोरा येथे रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून श्री. रमेशराव राजूरकर उद्योगपती व समाजसेवक वरोरा हे उपस्थितीत होते.भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित कै. निळकंठराव शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय वरोरा येथे रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून उद्योगपती व समाजसेवक रमेश राजूरकर वरोरा हे उपस्थित होते. रोजगार व स्वयंरोजगार कार्यरक्रमात मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांनी सरकारी सेवेच्या मागे न लागता आपण उद्योगपती होउन इतरांना नोकरी देणारे व्हावे असे मार्गदर्शन केले. प्राचार्य पियुष लांडगे यांच्या हस्ते पाहूण्यांचा सत्कार करण्यात आला.पाहूण्यांचा परिचय व प्रास्ताविक डॉ. प्रशांत पाठक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी खोंडे हिने केले हा कार्यक्रम महाविद्यालयाचे संचालक डॉ. कार्तिक शिंदे यांच्या प्रेरणेने घेण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रा. गुरुदेव जुमडे सर, प्रा.सीमा बोभाटे , प्रा.प्रणाली नरड, प्रा.प्रमोद पाठक, शकिल शेख, यांनी अथक परिश्रम घेतले.