बल्लारपुर (का.प्र.) - दिनांक 29/09/2022 रोज गुरुवारला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक शाखा जिवती च्या शिष्टमंडळाने मा.डॉ.भागवत रेजिवाड साहेब गटविकास अधिकारी पंचायत समिती जिवती यांची भेट घेऊन प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्येवर निवेदनासह चर्चा करण्यात आली.मंजूर वैद्यकीय देयकांची ऑफलाईन मागणी पंचायत समिती यादीनुसार जिल्हा परिषदला पाठवावी.मासिक वेतनातून होणाऱ्या विविध कपाती विहित मुदतीत जमा कराव्या.सहायक शिक्षक यांचे वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव जिल्हा परिषद ला पाठविण्यात यावे.सेवापुस्तक अद्ययावत करण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात यावे.संघटना समस्या निवारण सभा आयोजित करण्यात यावी.अप्रशिक्षित शिक्षकांची वेतनश्रेणी थकबाकी काढण्यात यावी.सेवापुस्तिका पडताळणीसाठी जिल्हा परिषदला पाठविण्यात यावे.तसेच विविध वैयक्तीक समस्यावर चर्चा करण्यात आली.वरील सर्व विषयावर सकारात्मक चर्चा करून समस्या प्राधान्यक्रमाने सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिकचे संजय लांडे जिल्हा कार्याध्यक्ष,विकास तुरारे जिवती अध्यक्ष,विजय भोयर जिवती कार्यवाह उपस्थित होते.