बल्लारपूर (का.प्र.) - समाजाचे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज भूषण पुरस्कार देण्याकरिता धनोजी कुणबी विकास महासंघ नागपूर यांच्या द्वारे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवर चे सत्कार करण्यात आला. त्यात श्री पांडुरंग जरिले यांना समाज भूषण पुरस्कार देण्यात आला. यांनी दुर्गम भागात भामरागड जिल्हा गडचिरोली, पॉम्भूर्णा, जिवती, राजुरा येथील दुर्गम भागात जाऊन अन्न दान, धान्य सामुग्री, कपडे वितरित करण्यात आले. तसेच दुर्गम भागात मेडिकल कॅम्प दरवर्षी घेण्यात येते. यांनी साईबाबा संस्थान 25 वर्षा पासून अध्यक्ष आहेत साईबाबा संस्थान तर्फे वरील सेवा उपलब्ध करण्यात येते. तसेच गरिब लोकांनाही स्व खर्चाने शिर्डी ला पालखी 12 वर्षा पासुन नेत असते. तसेच धणोजी कुणबी समाज द्वारा संत तुकाराम महाराज सेवा मंडळाचे अध्यक्ष 15 वर्षे सेवा देत आहेत. त्यामुळे समाजाच्या कृपेने खुप मोठा सभागृह केले आहे. दुर्गम भागातील गरीब मुलींचे शिक्षण साठी निवासाची व्यवस्था करण्यात आली. समाजाच्या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात आले. आगीत भस्मसात झालेल्या गावातील कुटुंबा ना धान्य सामुग्री, कपडे, आर्थिक मदत केली आहे. असे अनेक उपक्रम राबविले जातात. त्यामुळे पांडुरंग जरीले यांना माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांच्या हस्ते समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. धनोजी कुणबी विकास महासंघ नागपूर चे अध्यक्ष मधुकरराव ढोके, श्री आमदार मोहन जी मत्ते साहेब, श्री दिनकरराव जिवतोडे, उर्कंड साहेब, माजी आमदार पर्वे साहेब इतर मान्यवर उपस्थित होते.