भदावती (ता.प्र.) - भद्रावती शिक्षण संस्था द्वारा संचारित यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे दिनांक 28 9 2022 रोज बुधवार ला आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमांतर्गत अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.जयंत वानखेडे यांनी केंद्र शासन व राज्य शासन माहिती अधिकार अधिनियम २००५, नागरिकांचे मूलभूत कर्तव्य, हक्क, घटनेतील तरतुदी व कलमे इत्यादी बाबत विद्यार्थ्यांना यथोचीत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयंत वानखेडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक किशोर ढोक , डॉ.सुधीर मोते हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्ञानेश हटवार यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत पाठक यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.