जनसेवा हीच ईश्वर सेवा..!

बल्लारपुर (का.प्र.) - मानून आपल्या कार्यातून नेहमी समाजसेवा करणारे, आमचे मार्गदर्शक, आमचे गुरु तसेंच आमच्या सर्वांचे आदर्श स्थान असणारे आदरणीय श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार जी वन व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा संस्कृतीक कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांची प्रेरणा घेऊन उभारलेली समाज सेवि संस्था श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर द्वारे आज दिनांक 15.10.2022 ला बल्लारपूर मधील श्री रिंकू कुंबरे जी यांचा माननीय श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार जी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. रक्ता विना जीवन नाही आणि रक्ताची टंचाई सर्वत्र असून सुद्धा रिंकू कुंबरे हें सदैव जनतेच्या मदतीसाठी व ज्या व्यक्तीला रक्ताची अत्यंत गरज आहे अशा आजारी व्यक्तींना रक्ताची उपलब्ध करून देतात, अशातच गोंदिया जिल्ह्या मधील एका 17 वर्षीय मुलीला एका दुर्धर आजाराने ग्रासले असून तिला नागपूर येथे उपचाराकरिता दवाखान्यात आणण्यात आले होते. तिला एका अनमोल अशा म्हणजेच A2B या रक्ताची अत्यंत गरज होती अन्यथा तिचा जीव वाचणे शक्य नव्हते. A2B हें रक्त संपूर्ण जगात खूपच मुबलक प्रमाणात मिळतात. ही संपूर्ण माहिती आपल्या बल्लारपूर शहरातील रक्त संयोजन करणारे श्री रिंकू कुमरे यांना मिळताच यांनी मध्यप्रदेश येथील भोपाळ या शहरात राहणारे हितेश अरोरा यांच्याशी सम्पर्क साधला व त्यांना भोपाळ येथून नागपूरला बोलावून घेतले व स्वतः तेथे जाऊन A2B हें अनमोल रक्त आजारी मुलीला ज्या दवाखान्यात उपचारासाठी ठेवले होते तेथे पोहचविले.व एका गरीब घरच्या मुलीला जीवनदान दिले. श्री हितेश अरोरा यांचा आभार मानून त्यांना भोपाळ साठी रवाना केले. त्याच्या याच कार्याला श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब चा मनाचा मुजरा या त्याच्या कार्याची दखल मा.श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार जी वन व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा संस्कृतीक कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी घेऊन आज त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यात श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर जी, पूनमचंद बहुरिया जी, सुधाकर सिक्का जी, रिंकू गुप्ता जी आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.