बल्लारपूर (का. प्र.) - दिनांक 15.10.22 ला जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून आपल्या कार्यातून नेहमी समाजसेवा करणारे, आमचे मार्गदर्शक, आमचे गुरु तसेंच आमच्या सर्वांचे आदर्श स्थान असणारे आदरणीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार जी वन व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा संस्कृतीक कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांची प्रेरणा घेऊन उभारलेली समाज सेवि संस्था श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर द्वारे बल्लारपूर मधील गौरी ओपन कास्ट खान येथे ड्रॉयव्हर या पदावर कार्यरत श्री वेंकट भंडारी जी यांचा माननीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार जी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. वेंकट भंडारी यांना बाबू भंडारी या नावाने लोक ओळखतात. परंतु ते कवियत्री म्हणून 2016 पासून कार्यरत आहे आणि हमणवा या नावाने आपली कविता ते सादर करतात. त्यांनी आज पर्यंत असंख्य कविता केल्या आहे. त्यांची हिच रचना मेजर ध्यानचंद खेळरत्न काव्य सरोवरामध्ये सामावून घेतली आहे. त्यांनी आज पर्यंत बिहार,कर्नाटक, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश आदी राज्यातून त्यांना 240 सन्मान पत्र मिळाले आहे. तसेंच त्यांच्या कार्याची दाखल घेऊन गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ही त्यांचे नाव नोंदविले आहें. त्यांच्या याच कार्याला श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब चा मानाचा मुजरा या त्याच्या कार्याची दखल मा.श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार जी वन व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा संस्कृतीक कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी घेऊन आज त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यात श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर जी, पूनमचंद बहुरिया जी, सुधाकर सिक्का जी, रिंकू गुप्ता, भास्कर पेंदोर जी, राकेश लंबोळे जी, गोपाळ दूधपका जी आदी उपस्थित होते.