बल्लारपुर (का.प्र.) : श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडळ बल्लारपूर-बामणी व्दारे आयोजित महामानवांचा जयंती महोत्सव व मान्यवरांचा सत्कार सोहळा दिनांक २३/०२/२०२४ ला संत तुकाराम महाराज सभागृहात संपन्न झाला.यात जगतगुरु संत तुकाराम महाराज, कुळवाडी भूषण, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचा जयंती महोत्सव संयुक्तरीत्या साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री पांडुरंगजी जरिले यांनी भुषविले. कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती अल्काताई अनिलराव वाढई यांनी केले. राजुरा विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार मा.देवरावजी भोंगळे व वणी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार मा.संजयजी देरकर यांचा पुष्पगुच्छ, शाॅल व सन्मानचिन्ह देऊन मंडळातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच जयंती कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा.प्रा. डॉ. संजीव कोंडेकर संत तुकाराम विचार अभ्यासक यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी आपल्या ओघवत्या वाणीने तुकोबांचा वैचारिक वारसा: शिवराय ते गाडगेबाबा यावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच मंडळाचे आजीवन सदस्य मा. डॉ.मारोतराव पिंपळकर यांनी त्यांच्या पत्नी स्मृतिशेष माधवी पिंपळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंडळाच्या विकासासाठी एक लाख रुपयांची सढळ हाताने मदत केली.त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
मा. मोहम्मद शरीफ गुरुजी,मा. विजयराव मोरे,मा. ॲड.पवनजी मेश्राम यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्थान भुषविले. सकाळी १० वाजेपासून तर सायंकाळी ६-०० वाजेपर्यंत २४ भजन मंडळांनी सहभाग घेऊन जनजागृतीपर भजने गायली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजेंद्र खाडे यांनी केले. सुत्रसंचलन श्री नितीन वरारकर व श्री बालाजी भोंगळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार युवा आघाडीचे अध्यक्ष श्री विवेक खुटेमाटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. एम.यु. बोंडे, कोषाध्यक्ष श्री विनायकराव साळवे, सहसचिव श्रीमती कमलताई वडस्कर, संचालक सर्वस्वी श्री मनोहरराव माडेकर, श्री गजाननराव घुगुल, श्री एस.पी धांडे,प्रा.वाय.के. बोबडे,श्री बी.एम.वडस्कर, महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रीमती वंदना पोटे, सचिव श्रीमती सोनाली काकडे, उपाध्यक्षा श्रीमती किरण बोबडे व युवा आघाडीचे अध्यक्ष श्री विवेक खुटेमाटे, सचिव श्री अतुल बांदुरकर, व्यवस्थापक श्री सुमित कौरासे व प्रशांत मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले.