आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे भाविकांचा साखरी घाटावरून मार्कंडाला जाण्याचा मार्ग सोपा .!

साखरी घाटावरील रस्ता चांगला करण्याचे दिले होते निर्देश .. महाशिवरात्रीच्या निमित्ताने हजारो भाविकांची झाली सोय .!

चंद्रपूर (वि.प्र.) : महाशिवरात्री अवघ्या दोन दिवसांवर आली आहे.‘विदर्भाची काशी’ म्हणून ओळखले जाणारे मार्कंडा देवस्थान येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची रीघ लागते. मात्र,रस्त्या नसल्यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागेल, याची जाणीव आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांना होती. त्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, आणि काम वेळेत पूर्ण करण्यात आले. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील साखरी घाटावरील रस्त्यावरून मार्कंडा देवस्थानच्या दर्शनाला जाणे आता भाविकांसाठी सोपे झाले आहे. यासाठी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे भाविकांकडून आभार मानले जात आहेत.
राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या कार्यतत्परतेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. त्याला कारण ठरले गडचिरोलीतील मार्कंडा देवस्थान. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीच्या काठावर प्राचीन हेमाडपंती मंदिर आहे. दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठ्या उत्साहाने उत्सव साजरा केला जातो, ज्यामध्ये हजारो भाविक सहभागी होतात. सामान्यतः, या उत्सवाच्या दरम्यान पंधरा दिवसांची यात्रा भरते. काही दिवसांपूर्वी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मार्कंडा देवस्थानाला भेट दिली आणि मंदिराच्या कामकाजाची पाहणी केली, तसेच कामे लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांना साखरी घाटावरून मार्कंडाला जाण्यासाठी जवळचा आणि पर्यायी मार्ग आहे. यात्रेकरू दरवर्षी नदीतून मार्गक्रमण करून पायी येतात. परंतु छोटा पूल ओलांडल्यावर मध्ये खूप खडक असल्याने व पाणी वाहत असल्याने वयोवृद्ध, बालक,महिलांना खूप मोठ्या संकटाना सामोरे जावे लागले असते. परंतु चामोर्शी येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल आईंचवार यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेतली त्यानी तात्काळ आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना कळविले.
आ. श्री. मुनगंटीवार यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्या. अधिकाऱ्यांना जागेवर जाऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर साखरी घाटावर युद्ध स्तरावर काम झाले. यासाठी लॉयड मेटल आणि त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनीच्या कर्मचारी यांनीही मेहनत घेतली.चंद्रपूर जिल्ह्याच्या मार्गाने मार्कंडा देवस्थानाला दर्शनासाठी जाणाऱ्या हजारो भाविकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. भाविकांनी आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.