नाशिक येथे डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन चा सन्मान..!

४२ व्या महाराष्ट्र वार्षिक ऑप्थॅल्मोलॉजिकल परिषदचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले..!

नाशिक (जगदीश काशिकर) - महाराष्ट्र भरातील दिगग्ज डॉक्टर्स या परिषदसाठी उपस्थित राहिले होते. जे जे हॉस्पिटलच्या डॉ.रागिणी पारेख यांनी श्री मंगेश चिवटे यांना परिषदेसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले व त्यांना देवदूत पद्म्श्री डॉ.तात्याराव लहाने यांच्या हस्ते ते करत असलेल्या आरोग्यसेवेच्या कामानिमित्ताने सन्मानीत करण्यात आले.यावेळी देवदूत पद्म्श्री डॉ.तात्याराव लहाने जे जे हॉस्पिटलच्या डॉ.रागिणी पारक, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे (शिंदे गट) महाराष्ट्र राज्य संपर्क समन्व्यक जितेंद्र सातव, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र समन्व्यक राजाभाऊ भिलारे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख योगेश म्हस्के, नाशिक जिल्ह्य समनव्यक प्रथमेश पाटील उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.