बल्लारपुर (का.प्र.) - बल्लारपूर शहरातील प्रसिद्ध असे नगर संरक्षण दल यांची स्थापना नैसर्गिक आपदेपासून शहराचा बचाव करण्यासाठी मो.शरीफ यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रंगय्या अडुरंवार जी यांच्या अध्यक्षते खाली स्थापन करण्यात आली.नगर संरक्षण दल या संस्थे ने आज पर्यंत अनेक वेळा शहरातील लोकांच्या समस्या सोडविल्या तसेंच गणेश विसर्जन व दुर्गा विसर्जना नंतर दलाचे सदस्य संपूर्ण शहरांची स्वछता करतात. कोरोना काळात सुद्धा नगर संरक्षण दलाने आपले उत्कृष्ट कार्य पार पाडले होते. स्वच्छते अभियाना मध्ये आपले महत्वपूर्ण असे योगदान दिले. त्यामुळे त्यांना 40 विविध सामाजिक संस्थे द्वारे सन्मान चिन्ह व प्रमाण पत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे. याचीच दखल बल्लारपूर शहरातील सामाजिक संघटना श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर यांनी घेतली असून दिनांक 15.10.22 ला मा.श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार,वन व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सांस्कृतिक कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य, तथा पालक मंत्री चंद्रपूर व गोंदिया जिल्हा यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन त्यांनी केलेल्या शहरातील स्वच्छतेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. सत्कार मूर्ती नगर संरक्षण दल चे फाउंडर मेम्बर व विदर्भातील उत्कृष्ट खेळाळु श्री भास्कर पेंदोर जी यांना सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन तसेंच पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. या सत्कार कार्यात नगर संरक्षण दल चे फाउंडर मेम्बर सदस्य श्री भास्कर पेंदोर जी, राकेश लंबोळे जी, गोपाळ दूधपका जी तसेंच श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर जी, सुधाकर सिक्का जी, रिंकू गुप्ता जी, पूनम चंद बहुरिया जी आदी उपस्थित होते.