बल्लारपुर (का.प्र.) - रोजगार प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व कोजागिरी कार्यक्रम श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडळ बल्लारपुर बामणी द्वारा आयोजित कार्यक्रमात दि.15 ऑक्टोबर रोजी संत तुकाराम महाराज सभागृहात संपन्न झाला. रोजगार प्रशिक्षण यात शिलाई मशीन स्टिचिंग एम्ब्रॉयडरी व फॅशन डिझाईन व गृहोपयोगी वस्तू जवळपास 300 वस्तूचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मंडळाचे अध्यक्ष पी.यू.जरीले यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष भूषविले, उद्घाटक मा.रमेश राजूरकर प्रसिद्ध उद्योजक वरोरा यांनी रोजगार प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केले.
मा.विनायक धोटे साहेब संस्थापक वनिता आहार ग्रुप चे प्रसिद्ध उद्योजक चंद्रपूर व मा.दिलीपराव झाडे साहेब संस्थापक अध्यक्ष सर्च फाऊंडेशन, एम्ब्रॉयडरी स्टिचिंग क्लस्टर फाऊंडेशन चंद्रपूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मा.रमेश राजूरकर साहेब, विनायक धोटे साहेब, दिलीपराव झाडे साहेब यांनी युवा वर्ग व महिलांना स्वत: रोजगार कडे लघु उद्योग व कुटीर उद्योग बाबत अत्यंत मौलिक मार्गदर्शन केले. येणार्या काळात सरकारी नोकरी संपुष्टात येत नाही. म्हणून युवा वर्ग व महिलांनी स्वत रोजगार कडे वळणे आवश्यकता आहे. या बाबत लोकांना अवगत केले. या कार्यक्रमात सामाजिक प्रतिष्ठित मान्यवरांचे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यात श्री पी.यू.जरीले,डॉ.अनिल वाढई,डॉ. वसंतराव साळवे, प्रा.एम. यू.बोंडे सर, दत्तात्रय झाडे, प्रा.श्यामसुंदर धांडे, रामभाऊ वांढरे,यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा M.B.B.S.,B.E.,पदविका, 12 वी, 10 वी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच युवा आघाडीच्या वतीने आयोजित चित्रकला, निबंध स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धेत विजेत्यांचा तसेच महिला आघाडीच्या वतीने महिलांचे खेळ लहान मुलांचे वेषभूषा, वक्तृत्व स्पर्धा नृत्य स्पर्धा आयोजित विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य राजेंद्र खाडे सर, संचालन विवेक खुटेमाटे सौ. वंदना पोटे, कुणाल कौरासे यांनी केले. अध्यक्षीय भाषण पी.यू. जरीले यांनी केल्यानंतर आभार प्रदर्शन श्री अतुल बांदुरकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.एम. यू. बोंडे सर, मनोहर माढेकर सर, श्रीमती कमलताई वडसकर,विनायक राव साळवे, श्यामसुंदर धांडे सर, प्रा.युवराज बोबडे सर, गजानन घुगुल,के.एम.पोडे सर, भास्कर वडसकर तसेच युवा आघाडी चे अध्यक्ष विवेक खुटेमाटे,उपाध्यक्ष कुणाल कौरासे,प्रविण बर्डे,सचिव अतुल बांदुळकर,महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.वंदना पोटे, उपाध्यक्ष किरण बोबडे, सचिव सोनाली काकडे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली.