अनिल जायभाये बीडकर, भारतीय परिचारिका परिषद संस्थापक, महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियन संघटन राज्यकार्याध्यक्ष, रूग्ण हक्क परिषद सदस्य, शहिद भगतसिंग ब्रिगेड यांचे भावस्पर्शी मनोगत सामान्य जनतेसमोर जनजागृतीसाठी..!
मुंबई (जगदीश काशिकर) - भारतातील सर्व 130 कोटी सुजाण जनतेला, सर्व पक्षीय राजकीय नेतृत्वाला, कायदेतज्ज्ञांना, प्रशासनाला, न्यायपालिका यांना जाहिर आवाहन व सर्वांनाच दिपावलीच्या कोटी कोटी मनःपूर्वक शुभेच्छा..!
येणार्या 13.11.2022 ला रविवार रोजी होणार्या नांदेड येथील कार्यक्रमास जास्तीत जास्त खाजगी नर्सिंग स्टाफ व संबधित आरोग्य सेवेतील कर्मचारीवर्ग यांनी उपस्थित राहावे हिच नम्र विनंती.आमचे दैवत डाॅक्टर, माझा लढा हा देशासाठी आहे.वैयक्तिक नाही,कुणाच्या भावना दुखावण्याचा आजिबात हेतु नाही.ज्यांना माझी कायदेशीर चुक आहे असे वाटते त्यांचे खुप खुप मनःपुर्वक अभिनंदन.!लढा भारतातील सर्व खाजगी हाॅस्पिटल मधील नर्सिंग स्टाफ व संबधित खाजगी आरोग्य सेवेतील सर्व कर्मचारीवर्ग यांचा आणि लढा गोरगरीब सामान्य जनतेचा चांगली खाजगी आरोग्य सेवा कमी पैशात, अधिक दर्जेदार सेवा मिळण्याचा लढा,बेरोजगारी,महागाई,शेतकरी आत्महत्या,पिढ्यानपिढ्या कर्जबाजारीपणा,गरिबासाठीचे शिक्षण यापेक्षाही मोठा एक सामाजिक, दुर्लक्षित, अतिगंभीर प्रश्न.हा प्रश्न नक्कीच प्रत्येकालाच आयुष्यभर सतावणारा असेल.भारतातील, महाराष्ट्रातील व बीड जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यातील (विशेषतः परळी वैजनाथ) तसेच बीड शहरातील सर्व खाजगी हाॅस्पिटल मधील नर्सिंग स्टाफ व संबधित खाजगी आरोग्य सेवेतील सर्व कर्मचारीवर्ग यांना सर्व भारतीय 130 कोटी नागरिकांनी समर्थन, पाठिंबा देऊन लोकशाही मार्गाने, लोकहित लक्षात घेता, संविधानिक, कायदेशीर मार्गाने न्याय मिळवून द्यावा.
जिल्हा कामगार अधिकारी बीड यांना आम्ही रितसर 10.10.2022 सोमवार रोजी ला निवेदन दिले आहे पण अद्याप कुणालाही कसलीही साधी नोटीस पण नाही 14 दिवस झाले,प्रशासन पण कोर्टात जाण्यासाठी आम्हाला परावृत्त करतेय कारण दोष त्यांचा अजिबातच नाही हि न्यायव्यवस्थाच जर अशी डगमगु, हलु लागली असेल तर नवल नको पण आम्हाला संघर्ष करून नक्कीच विश्वास आहे न्याय भेटेल संविधान सर्वांनीच मिळून वाचवले पाहिजे.आम्ही ध्येयवादी, निराश, निशब्द, हतबल, आशावादी सर्व भारतातील, महाराष्ट्रातील सर्व गोरगरीब खाजगी नर्सिंग स्टाफ व ईतर सर्व खाजगी कर्मचारीवर्ग,खाजगी रूग्णालयात जाऊन साधी तपासनी सुध्दा केली जात नाही,खाजगी हाॅस्पिटल मधील डाॅक्टर यांच्या वर कसलीही कारवाई करण्याचा नैतिक अधिकार हा भारतातील कुठल्याही पोलीस , CBI, E.D., क्राईम ब्रांच, मिलिट्री यांना नसुन तो फक्त शासकीय डाॅक्टरच कारवाई शकतात, त्यांच्या चुका काढू शकतात पण ते माञ हिम्मत करतील असे वाटत नाही, इमानदारीने आपले काम करतील असे लोकांना वाटत नाही.
N .A. B. H . म्हणजेच अर्थात भारतातील सर्वात मोठी आरोग्य गुणवत्ता परिषद ,यंञना होय (NATIONAL ACCREDITATION BOARD FOR HOSPITAL AND HEALTH PROVIDERS) हे तालुक्याच्या सर्व ठिकानी जाऊन NABH परवानगी देत असेल तर मग नर्सिंग स्टाफ चे ऑनलाईन कागदपञे (ANM, GNM, BSC, PBSC, MSC NURSING AND PARAMEDICAL STAFF, LABOUR STAFF त्यानां मिळणाऱ्या सोयी सुविधांबाबत समान काम किमान वेतन, ई.पि.एफ, विमा संरक्षण, कामाच्या वेळेचे तास, दिविळी बोनस, प्रत्येक रूग्ण यामागे किती नर्सिंग स्टाफ असावा व ईतर हि शासकीय सवलती हे न पाहताच कसे परवानगी देतात हे धक्कादायक, लाजीरवाणे असुन याचा साहाजिकच परिणाम लोकांच्या जिवाशी खेळण्याशी येतो हे सर्व सामान्य जनतेनी, प्रशासकीय व्यवस्थेने NABH सारख्या गुणवत्ता साठी प्रसिद्ध असलेल्या समिती ने समजुन घेणे खुप आवश्यक आहे. फक्त परवानगी देण्याचा सपाटा लाऊ नये.
खाजगी हाॅस्पिटलच्या, खाजगी डाॅक्टरांच्या रजिस्ट्रेशन सोबत नोंदणी सोबत NABH ला परवानगी देताना, घेताना नर्सिंग स्टाफ व संबधित खाजगी आरोग्य सेवेतील कर्मचारीवर्ग यांचे पण नर्सिंग रजिस्ट्रेशन, शिक्षण, सुशिक्षित, अशिक्षित अशा सर्वांचे कागदपञे जोडत नसतील, मागत नसतील का?
प्रदुषण बोर्डाची POLLUTION BOARD परवानगी आहे का?
प्रत्येक वर्षी ची फेरपरवानगी आहे का ? त्याची तारिख तर निघुन गेली नाही ना ?
किती खाजगी हाॅस्पिटल ला किती खाटांची परवानगी आहे का ?
परवानगीची, शासकीय महसुलाची,भरलेली पावती आहे का?
खाजगी हाॅस्पिटल ची नगरपंचायत नगरपरिषद, नगरपालिकेत, महानगरपालिकेत, त्या ठिकाणच्याच शासकीय रूग्णालयात पण नोंद आहे का?
किती खाटांची (पलंग, काॅट संख्या) परवानगी आहे याचे प्रशासकीय पञ आहे का?
ते पञ दरवर्षीप्रमाणे फेरतपासणी साठी जाते का?
दरवर्षीप्रमाणेच शासकीय चलन,महसुल भरूनच परवानगी दिली जाते का?
अग्निशामक प्रतिबंधक विभागाची त्या खाजगी रूग्णालयाला परवानगी आहे का?
त्या खाजगी हाॅस्पिटल मध्ये अचानक जर आग लागली तर विझवण्याचे सर्व साहित्य जसे की गॅस पावडर, पाणी पावडर, इलेक्ट्रिक पावडर हे आहे का?
आग विझवण्याचे विविध 6 प्रकारचे गॅसेस असतात कागदी आग, इलेक्ट्रिक (मशिनरी) आग, सोने, चांदी, धातु आग, ॲसीड, धोकादायक पदार्थ आग, रूग्णालयात रूग्णांना चहा, नाष्टा, जेवन यासाठी लागणारा गॅस असे विविध आग विझवणारे गॅस आहेत का?यांची संख्या किती असावी?
नूतनीकरण दरवर्षीप्रमाणे असणे बंधनकारक असते का?
खाजगी हाॅस्पिटल च्या रूम संख्या वर, बिल्डींग वर, मजल्यांवर शासकीय महसुल दरवर्षीप्रमाणेच घेतला जातो का?
खाजगी हाॅस्पिटल ची स्वतःची पार्किंग असावीच का?
खाजगी हाॅस्पिटल मधील कचरा (बायोमेडिकल वेस्ट) हा कुठे जातो?
त्याचे वजन केले जाते का ते पण सोन्याच्या तराजु सारखे?
त्या वजनाप्रमाणे त्याचा शासकीय चलन, महसूल भरला जातो का?
कचऱ्याचे प्रकार किती?
कोरडा कचरा, ओला कचरा?
सलाईन कचरा?
काचेच्या बाॅटलचा कचरा?
धारदार,टोकदार सुयांचा कचरा?
कलर लाल, पांढरा, काळा, पिवळा, निळा, ग्रे,आस्मानी
हा सर्व कचरा जर एकञ केला तर लाखो रूपये दंड हाॅस्पिटल ला बसु शकतो?
हा कचरा घेऊन जाण्याचा अधिकार नगरपालिकेला असतो?
या कचर्यासाठी कोणती यंञना काम करते?
महावितरण MSEB चे प्रति युनिट लाईट बील हे खाजगी दवाखान्यात घरगुती चे दर असावे का ?व्यावसायिक असावे?
खाजगी दवाखाना व्यवसाय की समाजसेवा?
खाजगी हाॅस्पिटल वर नैसर्गिक सोलार ची खरी गरज आहे?
हाॅस्पिटल ला लिफ्ट का असावी?
महाराष्ट्रातील सर्व खाजगी रूग्णालयातील सर्व विविध समाजउपयोगी वैद्यकीय माहिती, बाह्यरुग्ण व आंतररुग्ण पेशंटचे सर सर्व फाॅर्म हे मराठीतच असावेत का?
रूग्णाला, नातेवाईकाला सर्व माहिती मराठीत नको का?
इंग्रजी मध्ये फाॅर्म असल्यामुळेच भारतातील बरेच डॉक्टर कायदेशीर पळवाटा काढतात?
पिण्यायोग्य चांगले फिल्टर चे पाणी असावे का?
हाॅस्पिटल ची सर्व माहिती रूग्णाला देणे जसे की काम करत असलेले कर्मचारीवर्ग, सेवा देत असलेले डॉक्टर व स्टाफ यांनी रूग्णालयात देणे बंधनकारक का?
रूग्णाचा उद्याचा, रोजचा होणारा आर्थिक खर्च रूग्णाला सांगणे, कळविणे गरजेचे का?
हाॅस्पिटल मधील सर्व खर्चांचा, विविध तपासणीचा कायमस्वरूपीचा खर्चाचा बोर्ड मोठा, तसेच सर्वांनाच दिसावा अशा ठिकाणीच का असावा?
रूग्णाला समजण्यासाठीचा प्रत्येक अधिकार का नसावा?
खाजगी हाॅस्पिटल मधील डाॅक्टरांना कोणकोणत्या शासकीय सोयी सुविधा मिळतात का?
(बँक,BSNL,रेल्वे)
डाॅक्टर हा पुढील होणार्या, येणार्या पिढीचा, समाजाचा घटक आहे का?
डाॅक्टर खरच देव असतो?
डाॅक्टर हा चांगला आरोग्यमुक्त समाज घडवू शकतो का?
खाजगी हाॅस्पिटलवर चुकीच्या गोष्टींवर देखरेख करणारा तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी कोण?
भारतातील सर्वात जास्त शासकीय महसुल, चलन खाजगी डाॅक्टर का भरतात?
कोव्हिड काळात खाजगी हाॅस्पिटल मधुन लुटमार आजिबातच झाली नाही हे खरे आहे का?
खाजगी हाॅस्पिटल ने रूग्णाला विमा संरक्षण, आरोग्य संरक्षण, LIC, खाजगी इन्शुरन्स,मेडिक्लेम बाबत माहिती देणे बंधनकारक आहे का?
खाजगी हाॅस्पिटल मध्ये जनरेटर असणे बंधनकारक का?
खाजगी हाॅस्पिटल मध्ये शासकीय नळजोडणी असणे बंधनकारक का?
सि.सि.टि.व्हि असणे गरजेचे का?
खाजगी रूग्णालयात ऑनलाईन बील भरण्याचा ,पावती मागण्याचा अधिकार असतो का?
खाजगी हाॅस्पिटल मधील सर्व डाॅक्टरांनी रूग्णाला मानसिक, आर्थिक ,वैयक्तिक ञास न देण्याची शासकीय शपथ घेतली होती का?
खाजगी हाॅस्पिटल मधील डाॅक्टरांचे अक्षर चांगलेच,स्पष्ट का असावे?
खाजगी हाॅस्पिटल मध्ये रूग्णाला कमी पैशात अधिकाधिक, सर्वोत्तम उपचार घेण्याचा अधिकार असतो?
रूग्णांचे विविध ऑपरेशन मधील बीनकामाचा कापलेला भाग ,अवयव,डेड स्किन,गाठी, ड्रेसिंग चा कचरा?
तो रूग्ण HIV ग्रस्त, कॅन्सर ग्रस्त, हेपाटायटिस A, किंवा यांसारख्या अनेक गंभीर आजाराने ग्रस्त असु शकतो हा कचरा गाई, म्हशीने जर खाला तर त्याचे दुध कोण पिणार तुम्ही,आम्हीच ना सर्व?
रूग्ण हक्क परिषद चे नियम व खाजगी डाॅक्टरांची सामाजिक बांधिलकी पण असावी कोण गरिब कोण श्रीमंत यांची आर्थिक बाजु बघूनच फीस घ्यावी सरसकट,एकसारखीच फीस घेऊ नये हे सर्व सर्वात बुद्धिमान समुह असणार्या खाजगी हाॅस्पिटल मधील डाॅक्टर यांच्या डोळ्यांना न दिसणारे बिलकुल नाही ते खुप समजदार असतात असा बर्याच जनांचा अनुभव आहे.
प्रत्येकाकडेच पैसा खुप असतो अस नाही.महाराष्ट्रातील 70% टक्के जनता हि बेरोजगारी, नौकरी, दुष्काळ, महागाई, शिक्षण यामध्येच परेशान असुन यापेक्षा हि जास्त खरे नुकसान हे अति पैसा च्या माध्यमातून महाराष्ट्रातील कमी जास्त सर्वच खाजगी हाॅस्पिटल मध्ये (अपवादात्मक काही चांगले हाॅस्पिटलपण आहेत) होत असुन मानवाला अन्न,वस्त्र, निवारा याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजेच आरोग्य सेवा झाली असुन महाराष्ट्रातील सर्वच शासकीय खाजगी हाॅस्पिटल मध्ये येणारे, उपचार घेणारे रूग्ण हे करोडोंच्याहि पलिकडचे आहेत आणि त्याची आर्थिक उलाढाल तर न विचारलेली बरी आमचा विरोध हा खाजगी आमचे दैवत डाॅक्टर ला नसुन या चुकीच्या व्यवस्थेला आहे.हि वस्तुस्थिती आहे यामध्ये कमी खर्चात चांगली खाजगी आरोग्य सेवा मिळू नये हि लाजीरवाणे,धक्कादायक, श्रीमंत तथा गोर गरिबांना सुद्धा आर्थिक बाजु अंपग करण्यासारखी, कंबरडे मोडण्यासारखी, देशोधडीला जाण्यासारखी, आयुष्यभर,पिढ्यानपिढ्या शासकीय खाजगी कर्जात मरण्यासारखी ,आत्मचिंतन करण्याची खरी गरज हि समाजातील सर्वच घटकांना अधिक आहे मध्यंतरी अमिर खान या भारतीय कलाकाराने सत्यमेव जयते च्या माध्यमातून यावर प्रकाश टाकला पण पुढे काय झाले हे सर्व भारतीय लोकांनी उघड्या डोळ्याने पाहिले असो.
(महाराष्ट्रातील सर्व खाजगी हाॅस्पिटल ची संख्या 70%टक्के व शासकीय संख्या 30% टक्के आहे)
खाजगी हाॅस्पिटल मध्ये दर्शनी भागात सर्व कागदपञे असावीत उदा.ऑल मेनूकार्ड,चार्जेस
जय संविधान
जय कामगार
जय किसान
जय जवान
जय विज्ञान
जय हिंद
जय परिचारिका..