"नयी जिंदगी , नयी शुरुवात करते है, कुछ भुले थे हम आज आपको याद दिलाते है।"
हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दिवाळी. फराळांचा गोड खमंग सुवास ,सभोवताली प्रसन्न वातावरण, रोषणाई ,गच्चीवरची पणती ची रांग आणि देवासमोर सुरेख रांगेतील पणती च्या उजेडाने खरी दिवाळी मनाला मोहुन जाते ;परंतु वाचक हो, या सर्वात आपण विसरतो ते हे की सर्व ज्याच्यामुळे शक्य आहे त्यांचे आभार मानणे. खरंच फराळ करून आपल्याला तृप्त करणाऱ्या आईचे आभार मानणे किती सोपे आहे. आपल्याला येईल तो पदार्थ करून आपल्या आईला देऊन व आपल्या सोबत फराळ करायला बसविणे हेही एक आभार मानायला पुरेसे आहे ,तसेच नवीन कपडे घेणाऱ्या बाबांना तर सुंदरच ग्रीटिंग अगदी पुरेसे असतं. बहीण भावाला दिवाळीसाठी एक आपुलकीची प्रेमाची साद आभार मानण्यासारखेच आहे ना ! हे झालं आभार घरच्यांचे पण ज्यांनी दिवाळीसाठी अहोरात्र मेहनत केली अशा दिवे बनविणाऱ्या लोकांचे आभार ,त्यांच्या कष्टाचे फळ देऊन आपण करू शकतो .कपडे घेताना ,फटाके घेताना, नवीन वस्तू घेताना ,मोजमजा करताना त्यांनी सांगितलेल्या भावात सर्व खरेदी करतो पण दिवाळीसाठी लागणाऱ्या पणती च्या भावात मात्र काटकसर करतो तेही सांगितलेल्या शिल्लक किमतीसाठी. वाचक ,ज्यांच्यामुळे आपली दिवाळी पूर्ण होते जे अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे कार्य करतात त्यांचा मात्र आपण विचार करत नाहीत पणत्या देऊन ते आपल्याला सुवर्ण प्रकाश देतात ,आपल्या घरातील अंधार नाहीसा करतात ,ज्या उजेडाने घरात लक्ष्मी येते परंतु आपण यांच्याशीच तडजोड करतो . आपल्यामधील काही लोक मात्र त्यांच्या कष्टाला मातीमोल समजतात .तर वाचक हो, त्यांच्या कष्टाला खरी किंमत देऊन आपण त्यांचे आभार व्यक्त करू शकतो .आभार व्यक्त करणे काही अवघड नाही ,आभार व्यक्त केल्याने मनातील कलह द्वेष, मत्सर या गोष्टींचा आपोआपच नाश होतो आणि सर्वजण आनंदित होतात पण राहतील . आभार कोणत्या प्रकारचे ,कोणत्या पद्धतीने केला तरी शेवट हा गोडच यात काही शंकाच नाही .जीवन देणाऱ्या देवतेला, पालन करणाऱ्या पालकांना ,मार्ग दाखविणाऱ्या गुरूंना, प्रत्येक वेळी साथ देणाऱ्या मित्रांना ,नातेवाईकांना, सक्षम निर्णय घेणाऱ्या आपल्या बुद्धीचे आभार मानणे आवश्यक आहे .कारण आपण जे काही आहोत ते फक्त त्यांच्यामुळे .
"कृतज्ञता महसूस करना और इसे व्यक्त न करना ठीक ऐसेही है जैसे एक उपहार को ढके रखना और इसे न देना ."
जीवनामध्ये प्रत्येकाचे आभार व्यक्त करणे जरुरीचे आहे मग तो कोणीही असो. वाचक .अहो मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटांमध्ये हे सांगितले आहे आपण पाहिले आहे ना संजय दत्त प्रत्येकाला "जादूची झप्पी " देऊन आभार व्यक्त करतो आणि ते आभार व्यक्त केल्यावर समोरच्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतो.
"जीवन मे किसी को निराश करके हवन भी करवाओगे तो कोई फायदा नाही और अगर किसी काम का आभार मानके उसे हँसा दिया तो आपको अगरबत्ती भी जलाने की जरूरत नही।"
वाचक हो जो स्वार्थी मतलबी असतो तर कधीच आभार, धन्यवाद मानत नाही मग आता तुम्हीच ठरवा आपण सर्व कोण आहोत?
तुम्ही माझे लेख आवर्जून वाचतात व जे वाचत नाहीत त्या सर्वांचे आभार. दैनिक गाववाला समस्त परिवारांचे आभार.!
"एक ताजगी ,एक ऐहसास
एक खूबसूरती ,एक आस
एक आस्था, एक विश्वास
एक शब्द, एक आभार ही है
अच्छे आदमी की पहचान।"
दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ।
धन्यवाद .!
सौ. स्मिता लक्ष्मीकांत मोहरीर ©️ नांदेड