"सूर तेच छेडीता " कार्यक्रम संपन्न..!


सुमधुर, सुश्राव्य गीतांनी भद्रावतीकरांची दिवाळीची सूरुवात..!दिवाळीच्या प्रकाश पर्वावर दिवाळी पहाट "सूर तेच छेडीता " कार्यक्रम संपन्न..!
बल्लारपुर (का.प्र.) - भद्रावती येथील निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाच्या प्राणांगणात भद्रावती शिक्षण संस्था , भद्रावती तर्फे दिवाळीच्या प्रकाश पर्वावर दिवाळी पहाट "सूर तेच छेडीता " कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन भद्रावती शिक्षण संस्था , भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती नीलिमाताई शिंदे , श्रीमती सुषमाताई शिंदे , डॉ सौ श्वेता शिंदे , सौ रुपाताई शिंदे , प्राध्यापक डॉ कार्तिक शिंदे , डॉ वैभव शिंदे , श्री रविंद्र शिंदे , प्रा. धनराज आस्वले प्राचार्या डॉ. एल. एस. लडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय परंपरेत आपल्याकडे दिवाळी हा सण अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. तो सण सर्वांसोबत साजरा व्हावा या संकल्पनेतून डॉ. विवेक शिंदे यांनी भल्या पहाटे दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन केले.या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. विवेक शिंदे यांनी हा सुश्राव्य गीतांचा कार्यक्रम ऐतिहासिक भद्रावतीच्या इतिहासात पहिल्यांदाच दिवाळी निमित्त भल्या पहाटे दिवाळी पहाट हा सुमधुर गीतांचा कार्यक्रम असून अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन करण्यात येईल अशी ग्वाही दिली. उपस्थित सर्व गायक कलाकारांचा आभार व्यक्त करत,सर्वांचा भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाकरिता सुमधुर निवडक मराठी - हिंदी गीतांची श्रवणीय महफिल सजविण्याकरिता प्रा. विवेक सरपटवार भद्रावती , वैदेही सरपटवार भद्रावती , आशुतोष सरपटवार , किशोर तडवेकर चंद्रपूर, बालाजी ताडे तसेच (सा रे ग म प फेम ) आर्ष सुरेश चावरे वर्धा व अजित कडकडे यांचे शिष्य अमित कुमार गाडगे वर्धा या प्रमुख गायकांच्या सुश्राव्य वैविध्यपूर्ण गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी सदर कलाकारांनी विविध सुमधुर निवडक मराठी - हिंदी गीतांची श्रवणीय महफिल सजवत समा बांधला व रसिकांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमाकरिता भद्रावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक, प्राध्यापक ,शिक्षक, रसिक श्रोते तसेच निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ. सुधीर मोते यांनी केले. भद्रावतीत दिवाळी पहाट हा कार्यक्रम भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीने आयोजित केल्याबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.