मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाने उचलले पाऊल..!
शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध - प्रा.संपतराव गर्जे
बल्लारपुर (का.प्र.) - महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघ, नागपूर विभाग नागपूर द्वारा कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षकांसाठी सात दिवसीय आभासी प्रशिक्षण शिबीर पार पडले. मराठी भाषेच्या समृद्धीसाठी आणि संवर्धनासाठी, तसेच मराठी भाषेच्या भाषा अध्यापनातील समस्या दूर करण्याच्या हेतूने , महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.हे प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 10 ऑक्टोबर 2022 ते 17 ऑक्टोबर 2022 पर्यंत आयोजित करण्यात आले . या सात दिवसात मराठी विषयाच्या अभ्यासक्रमातील विविध घटकावर तज्ञ मार्गदर्शकांद्वारे प्रशिक्षण देण्यात आले .
या कार्यक्रमाचा समारोप दिनांक 18 ऑक्टोबर 2022 ला करण्यात आला. या प्रशिक्षण वर्गाचे संयोजक नागपूर विभाग नागपूर मराठी विषय शिक्षक महासंघाचे भंडारा जिल्हा प्रतिनिधी हे प्रा.संजय लेनगुरे हे होते. मराठी भाषा व्यवहारिक पातळीवर समृद्ध आणि रोजगाराभिमुख करता येईल का? यावर सात दिवस प्रशिक्षणाद्वारा विचार मंथन झाले .जीवनाच्या विविध क्षेत्रात आपले विचार मोजक्या व प्रभावी शब्दात परिणामकारकपणे मांडण्यासाठी विद्यार्थी वर्गाला अभ्यासू व प्रभावी करावे लागते. ही जबाबदारी भाषा विषय शिक्षकांची आहे. नव्या तंत्रज्ञानाचा आणि तंत्राचा वापर करून मराठी भाषा ज्ञानभाषा म्हणून प्रगल्भ करता येईल . भाषा विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कलाजिवना सोबतच भाषिक कौशल्य प्रदान करून देऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या जीवनात जगण्याचे नवे सूत्र व्यावहारिक मराठीतून देऊ शकतो. भाषा जगण्याची संस्कृती प्रदान करते . ती जगण्यात प्रवाहीपणा निर्माण करते . मग ती व्यवहारात रोजगार देण्याचेही काम असू शकते. रोजगार हा कौशल्यातून प्राप्त करता येतो, तेव्हा भाषिक कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रेरणा आणि मार्गदर्शनाची तेवढीच गरज आहे. म्हणून विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन मूल्य रुजविण्यासाठी , विद्यार्थ्यांचे उद्याचे भविष्य उज्वल करण्यासाठी, व्यावहारिक मराठी आणि उपयोजन समृद्ध करू शकेल असे या प्रशिक्षणातून मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
मराठी भाषा विषयाच्या वेगवेगळ्या तज्ञांनी आपला विषय घटक सविस्तरपणे मांडून, यथायोग्य, सविस्तर मार्गदर्शन केले.या प्रशिक्षण वर्गाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून प्रा. तुलाराम चांदेवार , मुख्य नियमक, नागपूर विभाग नागपूर हे होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष, प्रा. सुनील डीसले , पुणे हे होते. कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघाचे सचिव, प्रा. बाळासाहेब माने, मुंबई ,कार्याध्यक्ष प्रा. संपतराव गर्जे, पुणे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
या सात दिवस चाललेल्या प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शक म्हणून नागपूर विभाग राज्य प्रतिनिधी, प्रा. उदय सुपेकर ,डॉ. प्रतिभा बिश्वास, प्रा. बापू खाडे, प्रा. रोहिणी कारंडे हे प्रामुख्याने उपस्थित होते . प्रमुख उपस्थिती तथा प्रशिक्षणाचे मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. नानासाहेब जामदार , प्रा. डॉ. पांडुरंग कंद, डॉ. सुजाता सेनई, डॉ. हेमराज निखाडे , प्रा. दिलीप जाधव , प्रा. ज्योती जोशी, प्रा.डॉ. स्मिता भुसे आदींनी विविध घटकांवर प्राध्यापक वर्गाला योग्य मार्गदर्शन करून शिक्षकांच्या शंकांचे निरसन केले . तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे प्रतिनिधी, नागपूर विभागातील सर्व पदाधिकारी , तालुका प्रतिनिधी, जिल्हा महिला प्रतिनिधी या आभासी प्रशिक्षण वर्गाला उपस्थित राहिले.
या ऑनलाइन विभागीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन नागपूर विभागाच्या कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघाच्या वतीने आयोजित केले होते. सदर ऑनलाईन प्रशिक्षणात नागपूर विभागातील प्राध्यापक बहूसंख्येने उपस्थित होते.समारोप कार्यक्रमाचे संचालक प्रा. विजया मणे , गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी तर आभार प्रा. मेघा राऊत नागपूर यांनी केले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ.ज्ञानेश हटवार, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, प्रा. सुरेश नखाते , नागपूर जिल्हा प्रतिनिधी, डॉ. दिशा गेडाम , प्रा.आशा आकरे, राजेश डंभारे, जितेंद्र टिचकुले, ऋषी दिघोरे, सारंग श्रीरामे , गिरीश काळे , अमृत महोतुरे , विद्या गोंगल , विद्या कुमरे, दिलीप करंबे, प्रा. दमाहे , प्रा. प्रीती कांबळे , मोरेश्वर कन्नाके , सारिका मंदाडे यांनी अथक परिश्रम घेतले.