"छोटी छोटी बातो मे आनंद खोजना चाहिए क्यू की बडी बडी बाते तो जीवन में कुछ भी होती है।"
दिवाळी हिंदू धर्माचा सर्वात महत्त्वाचा सण . हा सण फक्त हिंदूच नाहीतर सर्व धर्मातील लोकांनी मिळून साजरा करतात .एकमेकांना शुभेच्छा देतात . सर्वधर्मसमभाव एकात्मता या सणांमध्ये प्रखरतेने दिसून येते; पण तरीही जातीय भांडण, तंटे का होतात हेच कळत नाही. श्रीराम हे दैवत फक्त एका धर्माचे नाही तर सर्व जगातील दैवत आहे .जय श्रीराम म्हणले तर वाईट नाही आणि गुन्हा ही नाही. श्री रामासारखे व्यक्तिमत्व सारे जगतात नाही. एक बाणी,एक पत्नी, एक वचनी या सर्वांचा संगम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्र. दिवाळी हा सण सुद्धा आपण त्यांच्यामुळेच तर साजरा करतो. 14 वर्षे वनवास भोगून आल्यावर जेव्हा त्यांचे आयोध्या नगरीमध्ये आगमन होते तेव्हाचा उत्सव म्हणजे दिवाळी .रामायणाची कथा सर्वांनाच माहिती आहे .टीव्ही मालिकातून, चित्रपटातून आणि रामलीला या पथनाट्यातून. वाईट दृष्ट विचारांवर मात करून त्यांना नष्ट करून चांगल्या विचारांची आत्मसात करण्याची प्रथा म्हणजे रामायण .सर्व नात्यांचे , एकमेकांबद्दलचे प्रेम म्हणजे रामायण .मैत्रीसाठी काही पण याचा पुरावा देणारे रामायण. शत्रू ला ही आदराने प्रणाम करणारे रामायण या सर्व गोष्टींची निगडित आणि प्रेरणास्थान असणारे रामायण . रामलीला म्हणलं की मला माझं लहानपण आठवतं .रामायणातील सर्व पात्रे , चेहऱ्यावरची रंगरंगोटी ,ते रामायणातील पोशाख, संगीत ,गीते आणि त्यांच्या संवादातून समजल्या जाणारी त्यांची शैली. या सर्वांचा अनुभव आठवतो. गावागावातून रामलीला दाखवत ही कलाकार मंडळी रामायणाचे महत्त्व आणि त्यातील सत्कर्म दाखविण्याचा प्रयत्न करतात. रामलीला पाहायला गावातील पूर्ण जाती धर्मातील लोकांची गर्दी असायची, एकात्मतेचा आधार असायचा; परंतु आजकालच्या लोकांना पिढीला ही रामलीला माहीतच नाही. उत्तर प्रदेश ,बिहार ,मध्य प्रदेश या राज्यात आजही काही ठिकाणी रामलीलाचे प्रयोग होतात ; परंतु महाराष्ट्रात सध्या तरी ऐकले नाही .असे असताना सुद्धा नांदेड मधील ग्यान माता विद्याविहार ख्रिश्चन मिशन शाळा आणि संत फ्रान्सिस दि सेल्स वडनेरा या दोन्ही शाळेमध्ये यावर्षी दिवाळी सेलिब्रेशन साठी रामलीला दाखविली तीही चौथ्या वर्गातील लहान मुलांनी .अगदी गावातील रामलीला सारखी वेशभूषा, केशभूषा आणि संवाद शैलीपाहण्यासारखी होती " सियावर रामचंद्र की, जय हनुमान की जय " या घोषवाक्यांनी संपूर्ण शाळा दुमदुमली .सर्व विद्यार्थ्यांमध्ये व सर्व शिक्षक शिक्षकांमध्ये जणू काही रामलीला संचारली अशी परिस्थिती दिसत होती आणि विशेष म्हणजे रामायण काय आहे आणि दिवाळी का साजरी करतात हे या शाळेतील सर्व जाती-धर्मातील विद्यार्थ्यांना नक्कीच कळाले असेल .बंधुप्रेम, पिता वचन ,गुरु शिष्यांचे नाते, मैत्रीची निष्ठा ,पत्नीची साथ दुष्कर्मचा विनाश या सर्व गोष्टींची पूर्तता या बाल रामलीला मध्ये पहावयास मिळाली आणि म्हणूनच श्रीरामाचे नाव आपोआपच प्रत्येकाच्या तोंडामध्ये आले आणि शाळेचा परिसर रामायणमय झाला . कोणाच्या जयघोषाने आपण किंवा आपला धर्म बाटत नाही .चांगल्या आदर्श व्यक्तींचा नेहमीच जयघोष झालाच पाहिजे .रामायणाचा मर्म हा लोकांनाच कळाला पाहिजे. न जाणता कोणाबद्दल द्वेष करणे चुकीचे आहे.असे अनेक उपक्रम ठीक ठिकाणी राबविल्या गेले पाहिजे. भारतीय एकात्मतेची सध्याच्या काळात खूप आवश्यकता आहे .श्रीराम म्हणजे फक्त हिंदूच ही संकल्पना का अस्तित्वात आली हेच कळत नाही. पूर्वी टीव्हीवरील रामायण ग्रामपंचायत मध्ये दाखवायचे मला आठवतं की रामायण पाहिला सर्व धर्मातील लोक आवर्जून यायचे . रविवारचा सकाळी ९चा वेळ म्हणजे रामायण हे त्यांनी ठरविले होते मग आता ही एकता समाजामध्ये दिसत नाही .अगदी चौथ्या वर्गातील मुलांना आणि प्रेक्षक असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ही एकात्मतेची दिवाळी साजरी करण्याचे महत्त्व पटले तर तुमच्या आमच्या मोठ्या लोकांमध्ये ही अढी का असावी हेच कळत नाही .सत्य काय आहे हे जाणणे आवश्यक आहे .आपल्यामधील जो राम उरला नाही त्या रामाला परत जीवनात आणण्याचे काम आपणच केले पाहिजे. रामलीला यासारखे उपक्रम परत गावागावातून फिरले पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थाने अखंड भारत तयार होईल. या लहान मुलांनी आपल्याला मार्ग दाखविलेला आहे आता तो पुढे नेण्याचे काम समाजाचे आहे.
"एकता मे है ऐसी शक्ती जो तोड सकती है बडे से बडे दंभ
एकता का मार्ग अपना कर करे नवयुग का आरंभ "।
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.!
धन्यवाद..!
सौ. स्मिता लक्ष्मीकांत मोहरीर ©️
नांदेड .7420918198