दापोडी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वरील आळी येथे गेली 98 वर्ष कार्तिक स्नान निमित्त काकडा आरती - भजन ..!
मुंबई (जगदीश काशिकर) - पिंपरी चिंचवड - पुणे: पाटील दापोडी या गावठाणा विठ्ठल रुक्माई चे मंदिर आहे त्या मंदिराच्या देखभाल ट्रस्टचे अध्यक्ष ह भ प श्री सोपानरावजी भाडाळे वयाच्या 88 वर्षीही अजून सेवा करतात. त्यांची पत्नी चंद्रभागा भाडाळे या सुद्धा या सेवेत रमल्या आहेत नेहमी प्रमाणे ते सेवा करत असतात.दापोडी येथील सर्व भाविक भक्त सकाळी पाच वाजे पर्यंत मंदिरामध्ये एकत्र येऊन हरिनामाचा जप तसेच भजन म्हणून आरती करतात. यामध्ये पहाटे उठून नित्यनेमाने काकड आरती साठी मंदिरात येतात. मंदिरामध्ये येऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची सेवा करतात. यावेळी रोहिणी व शिवाजी काटे, निर्मला व नवनाथ काटे यांच्या हस्ते काकड आरती संपन्न झाली यावेळी सर्व भाविक भक्तांना अल्पपोहात देण्यात आला.