विदर्भ किसान मजदूर कांग्रेसच्या वतीने माजी खासदार श्री नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात व युवा नेते श्री राहूलबाबू पुगलिया यांच्या नेतृत्वात ६६ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्य भव्य भोजनदान कार्यक्रम संपन्न ..!
बल्लारपुर (का.प्र.) - बौध्द धर्म अनुप्रवर्तन दिनाचे मंगल पर्वावर तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्व वंदनिय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी रामनगर येथील दिक्षा भूमी बौद्ध बांधवांनी फुलून गेली, चंद्रपूर, गडचिरोली तथा विदर्भातील विविध भागातून बौद्ध बांधवांचे जथ्थेच्या जथ्थे दिक्षाभूमीवर प्रचंड संख्येत गोळा झाले. संपूर्ण दिक्षाभूमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमा माईच्या लेकरांनी फूलून गेली. जणू काही दिक्षा भूमीला प्रचंड महासागराचे स्वरुप प्राप्त झाले. दूर-दूर गावाखेड्यातून येणा-या बौध्द बांधवांच्या तहान भूकेची जाण ठेवून सामाजिक बांधिलकी व दायीत्वाची जाणीव ठेवून चंद्रपूर जिल्ह्याचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार श्री नरेशबाबू पुगलिया यांच्या विशेष मार्गदर्शनात व विदर्भ किसान मजदूर कांग्रेस तसेच संलग्न संघटनेच्या वतीने आयोजित भव्य भोजनदान कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे यावर्षी न्यु इंग्लिश हायस्कूल च्या मैदानात सर्किट हाऊस समोर घेण्यात आले. यात दोन दिवसापासून मुक्कामी असलेल्यांना भोजनदानातून संपूर्ण जेवन देण्यात येतो त्यामुळे त्यांना दिलासा मिळतो व ते समाधान व्यक्त करतात. ज्यांच्या नेतृत्वात व नियत्रंणात हा संपूर्ण कार्यक्रम पार पडतो असे काँग्रेसचे युवा नेते श्री राहूलबाबू पुगलिया यांच्या हस्ते वंदनीय भगवान गौतम बुध्द, महात्मा गांधीजी, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आले. व भोजनदानास सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी विदर्भ किसान मजदुर काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष श्री गजाननराव गावंडे, शहराध्यक्ष तथा माजी नगसेवक श्री अशोक नागापूरे, श्री करण पुगलिया, श्री अँड. विजयराव मोगरे, माजी नगरसेविका श्रीमती रत्नमालाताई बावणे, कृष्णन नायर, श्री रामदास वाग्दरकर, डॉ. वासू पद्माराव तोटा, युनियनचे श्री तारासिंग कलसी, श्री अनील तुंगीडवार, श्री गजानन दिवसे, श्री विरेंद्र आर्या, श्री सुदर्शन पुली, श्री राजेंद्र शुक्ला, श्री सुधाकरसिग गौर, श्री बाबुलालजी करुणाकर, श्री रतन शिलावार, श्री अजय महाडोळे, श्री राजू लहामगे, श्रीनिवास पारनंदी, सुनील बकाली, आकाश मासिरकर, विनोद पिंपलशेंडे, नासिर खान, भास्कर माकोडे, सचिन गावंडे, चेतन गेडाम, तसेच शाळेचे मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, शिक्षक शिक्षिका व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता विदर्भ किसान मजदूर कांग्रेस च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.