निळकंठराव शिंदे महाविद्यालयात 'राष्ट्रीय एकता दिवस' साजरा.!
बल्लारपुर (का. प्र.) - दिनांक ३१ऑक्टोंबर ला राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय भद्रावती जि - चंद्रपूर येथे भारताचे पहिले गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 'राष्ट्रीय एकता दिवस' साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके सर होते. प्राचार्य डॉ. एल. एस. लडके सर यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले व दिप प्रज्वलित करून पुष्प अर्पण केले. शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुष्प अर्पण केले व नंतर सर्वाना राष्ट्रीय एकता दिवस शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. गजेंद्र बेदरे यानी केले.प्राचार्य डॉ. एल. एस. लडके सर यांनी आपल्या भाषणात सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या अखंडते साठी काय कार्य केले याविषयी मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन प्रा. संदीप प्रधान यानी केले. या कार्यकमास शिक्षकक्तेर कर्मचारी श्री. किशोर भोयर, श्री अजय आसुटकर, सुकेशिनी भवसागर, शरद भावरकर, प्रमोद तेलंग, श्री आखतकर उपस्थित होते.राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक सहभागी होते.