आमदार राजेश दादा पाडवी यांनी दिला रुग्णाला दिलासा!


मुंबई (जगदीश काशिकर) - जिजाबाई अहिरे या गरीब रुग्णाचा उपचार खानदेश कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सुरू होता परंतु या काळात त्यांचा उपचाराचे बिल जास्त असल्यामुळे संपूर्ण परिवार सतत काळजीत होते. 
त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांना आधीच दवाखाना परवडत नसताना तब्येतीमुळे उपचार घ्यावे लागले. 
पैशांची जुळवाजुळव कशी करावी हे कळत नव्हते अशा वेळी शहादा तळोदा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार राजेश पाडवी यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जिजाबाई अहिरे यांना योग्य ती मदत मिळून दिली. तसेच उपचाराच्या खर्च त्यांच्या आवाक्या बाहेर असल्यामुळे आमदार राजेश पाडवींनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे विनंती करून बिलामध्ये सवलत मिळवून देण्यासाठी सूचना दिल्या. 
त्याचा आवश्यक फायदा झाला यासाठी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे तसेच विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख - मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांच्या सहकार्याने अशी मदत महाराष्टातील जनतेला विविध ठिकाणी गरजवंत रूग्णांना त्यांच्या रूग्ण सेवकांमार्फत होत आहे तरी जनतेने जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन हीच माहिती गरीब आणि गरजु रुग्ण व त्यांच्या कूटुंबा पर्यत पोहचवणे गरजेचे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.