डॉ.विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालयात संविधान दिन साजरा.!

भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती येथील भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय मध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे , सचिव डॉ. कार्तिक शिंदे , डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद पाठक, यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयंत वानखेडे , डॉ. प्रशांत पाठक, डॉ. ज्ञानेश हटवार हे व्यासपीठावर उपस्थित होते.
अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना डॉ. विवेक शिंदे यांनी संविधानाचे महत्त्व समजावून सांगितले. तर डॉ. कार्तिक शिंदे यांनी संविधान निर्माण करत असताना भारतीय सामाजिक परिस्थितीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास करून भारतीय समाजाला नवीन दिशा दाखवण्यासाठी संविधान निर्माण केले याबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ.जयंत वानखडे यांनी संविधानामध्ये असलेल्या मूलभूत हक्कांचे महत्व स्पष्ट केले. 
संविधान दिनानिमित्य कार्यक्रमानंतर लगेचच महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक रमेश चव्हाण , किशोर ढोक , नरेश जांभुळकर, प्राध्यापक आणि शिक्षकेतर सर्व कर्मचारी व विद्यार्थी यांनी योगदान दिले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.