विवेकानंद महाविद्यालयात संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन.!

भद्रावती (ता.प्र.) - “संविधान हा लोकशाहीचा आत्मा असून आपल्याला लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संविधानात दिलेल्या मानवी हक्क, अधिकार, कर्तव्ये, नियम व कायद्याचे पालन करावे लागते. अन्यथा स्वातंत्र्याला अर्थ उरणार नाही” असे विचार प्राचार्य डॉ नामदेव उमाटे यांनी व्यक्त केले. ते महाविद्यालयात संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. श्री अरविंद सभागृहात आयोजिण्यात या कार्यक्रमात यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून इतिहास विभागप्रमुख डॉ. जयवंत काकडे, रासेयो, सहकार्यक्रम अधिकारी डॉ.रमेश पारेलवार, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. बंडू जांभुळकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. उमाटे यांनी संविधान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना संविधानाच्या उद्देशीकेचे सामूहिक वाचन करून संविधानाचे पालन करण्याची शपथ दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बंडु जांभुळकर, संचालन प्रा. अमोल ठाकरे, आभारप्रदर्शन प्रा.नरेंद्र लांबट यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.