अपघाताची सखोल चौकशी करण्याची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे खासदार बाळू धानोरकर यांची मागणी.!
बल्लारपुर (का.प्र.) - चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर जंक्शन येथील फूट ओवर ब्रीज ला अपघात झाला असून, 13 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रवाशांवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश खासदार बाळू धानोरकर यांनी दिले आहेत.
आरोग्य विभागाने तातडीने वैद्यकीय यंत्रणा तैनात करावी अशा सूचना देखील दिलेल्या आहेत. या अपघाताची चौकशी करण्याची मागणी त्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केलेली आहे.
अधिक माहितीसाठी आणि उपचारासाठी खासदार बाळू धानोरकर यांचे वैद्यकीय प्रतिनिधी अनिल शीरसागर +919890118371 यांच्याशी संपर्क साधावा. वैद्यकीय उपचाराकरिता संपर्क साधण्याचे आवाहन खासदारानी केले आहे.