"करिअर कट्टा" या उपक्रमांतर्गत संविधान दिनाचे आयोजन..!

निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात "करिअर कट्टा" या उपक्रमांतर्गत संविधान दिनाचे आयोजन..!
बल्लारपुर (का.प्र.) - स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने " करिअर कट्टा " या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री यशवंत शितोळे , अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र , प्रमुख अतिथी माननीय एडवोकेट धनराज वंजारी , साहित्यिक वैज्ञानिक व निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई , डॉ रोहित वनकर , करियर कट्टा जिल्हा समन्वयक यवतमाळ (ग्रामीण) तसेच कार्यक्रमाचे आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल एस लडके , प्राचार्य प्रवर्तक चंद्रपूर जिल्हा व चंद्रपूर जिल्हा करिअर कट्टा समन्वयक प्राध्यापक डॉ अपर्णा धोटे उपस्थित होते.
सर्वप्रथम भारतीय संघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते मानवंदना देण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा प्राचार्य प्रवर्तक करिअर कट्टा चंद्रपूर जिल्हा डॉ एल एस लडके यांनी संविधान दिनी भारताचे संविधानाविषयी जनजागृती करणे व संविधानाचा प्रसार करणे हा संविधान दिन कार्यक्रम आयोजन करण्याचा हेतू स्पष्ट केला.
याप्रसंगी माननीय डॉ शैलेंद्र देवळाणकर , संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य यांनी ऑनलाईन पद्धतीने व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित राहून संविधान दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्याच्या करिअर कट्टा या कार्यक्रमाचे रीतसर उद्घाटन झाल्याचे घोषित केले तसेच त्यांनी आपल्या मार्गदर्शनात भारतीय राज्यघटना संपूर्ण जगातून कशी परिपूर्ण सर्व घटकांचा समावेश आहे याविषयी माहिती दिली आजपर्यंत आम्ही इतर देशांच्या बेस्ट प्रॅक्टिसेस चा वापर करीत होतो परंतु आज इतर देश आमच्या बेस्ट प्रॅक्टिसेस अमलात आणत आहेत याचे उदाहरणासहित स्पष्ट केले तसेच आज आपल्या देशात स्वातंत्र्य समता व बंधुतेमुळे शांततामय वातावरण आहे हे स्पष्ट केले तसेच आपण कर्तव्याविषयी जागृत असणे व जाणिवे बद्दल सवेदशील असणे म्हणजेच सविधान असे आपले विचार व्यक्त केले.
तसेच याप्रसंगी माननीय एडवोकेट धनराज वंजारी यांनी याप्रसंगी सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले तसेच त्यांनी 26 नोव्हेंबर संविधान दिन चे महत्व तसेच मुंबई येथील 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्यात पोलीस अधिकारी शहीद झाले म्हणून आजचा दिवस शहीद दिन म्हणून सुद्धा साजरा करतो तसेच याप्रसंगी विद्यार्थ्यांना वेळेचा सदुपयोग कसा करावा व भावनिक न होता बुद्धीचा उपयोग कसा करावा व आपले करिअर कसे निर्माण करावे व स्वतःची ओळख स्वतः करावी तरच जीवन सफल होतो व आपण आपले अस्तित्व कसे निर्माण करावे असे आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री यशवंत शितोळे , अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारतीय संविधान व त्याचे महत्त्व स्पष्ट केले तसेच करिअर कट्टा या उपक्रमाचे महत्त्व विशद करताना विद्यार्थिनी प्रशासकीय सेवेमध्ये व उद्योजकांमध्ये सहभाग जास्तीत जास्त घ्यावा यासाठी करिअर कट्टाचे आयोजन होय तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या मधील क्षमतांचा विचार करावा असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण झूम लिंक द्वारे संपूर्ण महाराष्ट्र प्रक्षेपित करण्यात आली.
या कार्यक्रमाचे संचालन करिअर कट्टा चंद्रपूर जिल्हा समन्वयक प्राध्यापक डॉ अपर्णा धोटे तर आभार प्रदर्शन डॉ. रोहित बनकर करिअर कट्टा जिल्हा समन्वयक यवतमाळ ग्रामीण यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्राध्यापक डॉ गजेंद्र बेदरे , प्रा डॉ नरेद्र हरणे , प्राध्यापक संदीप प्रधान , प्राध्यापक डॉ खादरी , प्राध्यापक कुलदीप भोंगळे प्राध्यापक लेफ्टनंट सचिन श्रीरामे , प्राध्यापक डॉ किरण जुमडे , श्री अजय आसुटकर , श्री भावरकर , श्री आखतकर , श्री तेलंग यांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.