बल्लारपुर (का.प्र.) - मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशत वादी हल्ल्याला आज 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. समुद्रमार्गाने आलेल्या सर्व 10 पाकिस्तान च्या जैश-ए-मोहम्मद च्या दहशतवाद्यांनी ताज हॉटेल ला लक्ष करीत सामान्य जनतेवर गोळीबार केला. त्यांच्यावर बॉम्ब स्फ़ोट केला.यात 160 लोकांना आपला जीव तर 300 हुन अधिक लोक जखमी झाले.याच पाश्वभूमीवर आज बल्लारपूर शहरातील समाजसेवी संस्था सुधीर भाऊ जनसेवा बहुउद्देशीय संस्था बल्लारपूर (श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर ) च्या वतीने बल्लारपूर शहरातील महाराणा प्रताप वार्ड, माता मंदिर जवळ शहिदाना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम ठेवला असून या कार्यात प्रमुख पाहुणे म्हणून शहराचे माजी पी.एस.आय. दिवाकर चौधरी जी हें उपस्थित होते. यांनी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच हल्ल्याला ठामपने समोर जाणाऱ्या वीर सुरक्षा रक्षकांना अभिवादन केले. या कार्यात सुधीर भाऊ जनसेवा बहुउद्देशीय संस्था बल्लारपूर (श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर ) चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर जी, माजी नगर सेवक स्वामी रायबरम जी, कैलास गुप्ता जी, सुधाकर सिक्का जी, कमल वर्मा जी, सुरेश हजारें जी, विलास कांबळे जी, श्रीधर गुंडेट्टी जी,प्रभास कोंकटी जी,आकाश कोटा जी, अभिषेक ईदनुरी जी, रिंकू गुप्ता जी, मुरली व्यवहारे जी, आकाश वाडीकर जी, अनिकेत पोतर्लावार जी, जशी अडला कोंडावार जी, केतन तंगरम जी, आदर्श पोतर्लावार जी, आर्यन पोतदार जी, विशाल वाडीकर जी, पुरण अंकल आदिंनी श्रद्धांजली वाहिली.