राजापूर तालुक्यात प्रस्तावित ग्रीन रिफायनरी ला मी दिलेला पाठिंबा का?

आमदार डॉ.श्री राजन साळवी यांचे मनोगत..!
मुंबई (जगदीश काशिकर) -  काल मंत्रालय मुंबई येथे बारसु ग्रीन uv रिफायनरी प्रकल्पाबाबत महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी-रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस मी उपस्थित राहून प्रकल्पा संदर्भातील माहिती जाणून घेतली तसेच येणाऱ्या प्रकल्पाच्या अनुषंगाने स्थानिक तरुणांना रोजगार तरच राजापूर तालुक्यात आरोग्याच्या दृष्टीने सुसज्ज असे हॉस्पिटल व्हावे व राजापूर शहरातील पावसाळ्यात भरणाऱ्या पुराच्या पाण्याबाबत नदीतील गाळ उपसणे व प्रकल्पाला लागणारे पाणी कोयना धरणातून आणावे आणि ते आणत असताना चिपळूण-संगमेश्वर-रत्नागिरी-लांजा-राजापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना त्याचा लाभ मिळावा व ग्रीन रिफायनरी चा दृष्टीने पर्यावरणाला पूरक अशी वृक्ष लागवड करण्यात यावी या संदर्भ बैठकीत मुद्दा उपस्थित केला. असता महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी-रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी ताबडतोब सर्व मुद्दे मान्य करून प्रकल्प राजापूर तालुक्यात होत. असताना मी दिलेले मुद्दे हे जनतेच्या मनातील असून ते पूर्ण करूनच प्रकल्प पूर्ण केला जाईल असे अभिवचन दिले. त्यावेळी मी जनतेच्या मनात असलेल्या मागण्याचे निवेदन सादर केले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.