बल्लारपुर (का.प्र.) - मौलाना आझाद वॉर्ड,बल्लारपुर येथील वयोवृद्ध श्री मारोती परचाके यांना कोणाचाही सहारा नसून पत्नी आधीच मरण पावली. पडक्या झोपडीत राहत असून त्यांची झोपडी रोडवरून 6 फुट खाली आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी त्यांची झोपडीत जात असे. तेव्हा ते झाडाच्या खाली थांबत असे. कसे बसे जिवन जगत आहेत. वन विभागाची जागा असल्यामुळे सरकारी घरकूल मिळू शकले नाही. हे समाज सेवक श्री बंडू भाऊ लोनगाडगे यांच्या लक्षात येताच त्यांनी लोकवर्गणीतून दोन रूमचे बांधकाम करण्याचा संकल्प केला. त्यानुसार वे.को.लि.व गुरूदेव सेवा मंडळ तसेच इतर सेवा धारि लोकांकडून लोकवर्गणी गोळा करून बांधकाम साहित्य आणले. व आज दि.23 नोव्हेंबर ला भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अशोक कुमार पटेल वे.को.लि.अधिकारी, कार्यक्रमाचे उदघाटक समाज सेवक श्री पी.यू. जरीले, प्रमुख पाहुणे गुरूदेव सेवा मंडळ चे सेवा अधिकारी श्री डांगे जी, प्रास्ताविक डांगे साहेब, संचालन व आभार श्री सतीश ढोके तसेच बंडू भाऊ लोनगाड़गे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला सोयाम, पेंदोर महाराज, भय्याजी त्र्यंबके ,पंडित देवुळकर,उईके, मांडवकर, दिनेश, गुरूदेव सेवा मंडळ, वे.को.लि.चे कर्मचारी तसेच बल्लारपुर चे बरेच लोक व महिला उपस्थित होत्या.