भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे उच्च माध्यमिक विद्यालय चिचोडी, भद्रावती येथे शालेय खेळाडूंना क्रीडा किडचे वाटप प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले.
विभाग, जिल्हा, तालुका स्तरावर विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. त्यासाठी विविध क्रिडा प्रकारात अनेक खेळाडूंना सतत सराव देण्यात येत आहे. यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालया तर्फे खेळाडू मुला, मुलींना क्रिडा कीटचे वितरण प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. खेळाडूंनी चिकाटीने सराव करून यश संपादन करावे असे मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार, किशोर चौधरी क्रिडा शिक्षक रमेश चव्हाण,किशोर ढोक तसेच खेळाडू मुले,मुली हजर होते.

