चंद्रपुर (वि.प्र.) - भारताचे महान स्वातंत्र्य सेनानी व प्रथम शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त खासदार बळुभाऊ धानोरकर यांच्या मार्गदर्शनात,आज दिनांक 11/11/2022 रोजी संध्याकाळी 5 वाजता चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग च्या वतीने आकाशवाणी समोरील अल्पसंख्यांक विभागच्या कार्यालयात मौलाना अबुल कलाम आझाद जयंती राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली व त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले सदर कार्यक्रम सोहेल रजा शेख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला असून मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद रमज़ान अली यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जीवनावर प्रकाश टाकून महत्त्वाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सोहैल रज़ा शेख यानी सर्वाना एकत्रित येऊन काँग्रेस पक्ष बळकट करण्याचे आवाहन करीत घरा घरात काँग्रेस पक्ष पोहोचविण्याचे संकल्प आपण करू असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार पक्षाचे चंद्रपूर जिल्हा शहर अध्यक्ष रूबीना यास्मीन मिर्जा , चंद्रपूर जिल्हा कांग्रेस कमिटी अ. वि. चे जिला उपाध्यक्ष शेख अनवर हुसैन, चंद्रपुर शहर कांग्रेस कमिटी अ.वि. चे शहर महासचिव ताजुद्दिन शेख,अंकित ठाकूर,आमिर शेख, अरबाज शेख,साजिद सिद्दीकी,इरफान शेख, कमरुल शेख,राजू निषाद,सूरज यादव, धीरज यादव चंद्रपूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभगचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित दर्शविली अशी माहिती एका पत्रकान्वये कळविले.
