चंद्रपुर जिल्ह्यात मादक पदार्थ छुप्या मार्गाने येत असल्याची चर्चा ..!

चंद्रपूर (का.प्र.) चंद्रपूर जिल्ह्यात मागिल काही वर्षापासुन विविध व्यसनाचे प्रमाण युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे.चंद्रपुर जिल्ह्याची दारूबंदी उठली त्यांनतर सुद्धा गांजा ब्राउन शुगर सह अनेक मादक पदार्थ छुप्या मार्गाने येत असल्याची चर्चा होत आहे व शहरात नव्हे तर जिल्हयात विक्री होत आहे. शहरातील बांबूपेठ भागात काही महिन्यांपासून ब्राउन शुगरची विक्री होत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली, शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकासह पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे स्वतः धाड मारण्याकरीता बाबूपेठ येथे पोहचले.
त्याठिकाणी पोलिसांनी तब्बल 38 ग्राम ब्राउन शुगर एकूण किंमत 1 लाख असा मुद्देमाल जप्त केला.विशेष म्हणजे रेकॉर्डवरील असलेला गुन्हेगार अजय दुपारे हा आपल्या आई - वडिलांच्या हस्ते ब्राऊन शुगर विकण्याचा धंदा करीत होता, पोलिसानी श्याम दुपारे व रेखा दुपारे यांना अटक केली असून अजय दुपारे हा पसार झाला.कुणालाही संशय जाऊ नये यासाठी अजय ने आई वडिलांचा वापर केला, अजय ब्राऊन शुगर बाहेरून आणुन विकण्यासाठी देत होता. 
अजय चा हा ब्राऊन शुगर विकण्याचा सुपर मास्टर प्लॅन चंद्रपूर शहर पोलिसांनी उधळून लावला. अश्या अवैद्य धन्द्यावर लवकरआळा घालण्यासाठी शहर पोलीस तत्पर आहे. सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक प्रमुख जयप्रकाश निर्मल यांच्या नेतृत्वात शरीफ शेख, विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, जयंता जुनारकर, दिलीप कुसराम व इम्रान खान यांनी केली.असुन या कारवाइ चे अनेक स्तरावरून कौतुक केले जात आहे.
✒️... सय्यद रमज़ान अली .!

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.