भद्रावती (ता.प्र) - तालुका क्रीडा संकुल भद्रावती येथे शालेय क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. त्यात 19 वर्ष वयोगटाखालील मुलांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत शिंदे कनिष्ठ महाविद्यालयातील व्हॉलीबॉल संघाने तालुक्यावर विजय प्राप्त करून, जिल्हास्तरावर खेळण्यासाठी पात्र झालेले आहेत.
तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत 19 वर्षे वयोगटातील झालेल्या हॉलीबॉल च्या सामन्यात प्रथम फेरीत जिल्हा परिषद हायस्कूलच्या संघावर शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने मात केली, तर अंतिम सामन्यात फेरील्यांड विद्यालयाच्या संघावर मात करत शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने विजय प्राप्त केला. तालुकास्तरावर प्रथम आले. तालुकास्तरावर प्रथम येऊन जिल्हास्तरीय होणाऱ्या क्रीडा स्पर्धेत शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचा व्हॉलीबॉल संघ भद्रावती तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे .
विजय संघातील खेळाडूंचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ. विशाल शिंदे, प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, क्रीडाशिक्षक रमेश चव्हाण, माधव केंद्रे , डॉ. ज्ञानेश हटवार, किशोर ढोक , समस्त प्राध्यापक , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. मार्गदर्शक म्हणून प्रा. रमेश चव्हाण तर संघ व्यवस्थापक म्हणून माधव केंद्रे यांनी काम सांभाळले.