अमरावती (वि.प्र.) - विदर्भ संगीत व सांस्कृतिक कला प्रसारक मंडळ ही संस्था केवळ दुर्लभ दुर्लक्षित उपेक्षित वंचित कलाकारांसाठीच काम करते कारण जे कलाकार सक्षम आहेत मोठे आहेत त्यांचं नाव आहे, प्रसिद्धी आहे त्यांच्याकडे पैसा आहे त्यांना नेहमी काम मिळते ते कलाकार दुर्लभ दुर्लक्षित उपेक्षित वंचित कलाकारांना सहकार्य करत नाहीत ही फार मोठी शोकांतिका आहे.
म्हणून या दुर्लभ दुर्लक्ष उपेक्षित वंचित कलाकारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण विदर्भ संगीत व सांस्कृतिक कला प्रसारक मंडळाची स्थापना केली आहे.
या संस्थेअंतर्गत आपण गायन, वादन, नृत्य, अभिनय, गीतलेखन, संगीत, दिग्दर्शन, चित्रकला, शिल्पकाला, चित्रपट निर्मिती, व दिग्दर्शन इत्यादी क्षेत्रात वरील सर्व कलावंतांना संधी उपलब्ध करून देण्याचे काम सन 2006 पासून प्रामाणिकपणे करीत आहोत.
विदर्भ संगीत व सांस्कृतिक कला प्रसारक मंडळ या संस्थेने 3 मोठे चित्रपट, 2 सिरीयल, 3 लघुपट, 80 च्या आसपास गाण्यांची निर्मिती करून त्यामध्ये वरील सर्व कलावंतांना त्यांच्या त्यांच्या गुणवत्तेनुसार स्थान प्राप्त करून दिलं आहे.
आणखीन 2 मोठ्या चित्रपटाची व 30 गाण्यांची निर्मिती संस्था करणार आहे या चित्रपट व गाण्यांमध्ये सुद्धा दुर्लभ दुर्लक्षित उपेक्षित वंचित कलाकारांना काम करण्याची संधी संस्था देणार आहे.
तत्पूर्वी ज्या ज्या कलावंतांनी संस्थेचे सभासदत्व घेतलेले आहे सभासद फॉर्म भरलेले आहेत त्यांनी आप आपले सभासद फॉर्म फोटो संस्थेकडे येत्या 8 दिवसात जमा करावे.