श्री चंदनसिंह चंदेल यांच्या हस्ते घट स्थापना .!

बल्लारपुर (का.प्र.) - शारदीय नवरात्र उत्सव च्या पवित्र पावन पर्वावर सनातन बाल दुर्गा मंडळ, बी टी एस प्लॉट बल्लारपुर येथे मा.श्री चंदनसिंह चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते घट स्थापना व पुजा अर्चना संपन्न झाली.या पवित्र प्रसंगी आदरणीय बाबुजी यांनी आई जगदंबा यांना भारत देशाची प्रगती व नावलौकिक तसेच प्रत्येक भारतवासी हा सुखी,समृद्ध आणि शांतीने नांदावा करीता प्रार्थना केली व समस्त जनतेला नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. सनातन बाल दुर्गा मंडळ च्या संपुर्ण टीम ने मोठ्या उत्साहात व भक्ती भावाने यात सहभाग घेऊन आई दुर्गे चा आशीर्वाद घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.