बल्लारपुर (का.प्र.) - नवरात्रि व धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून बल्लारपुर तालुकातील बामणी ग्राम येथे विकलांग व बहुविकलांग अतीशय गरजू व्यक्तींना समाजसेविका सुशीला पुरेड्डीवार यांचा पुढाकाराने व्हीलचेअर व आधारकाठी वाटप करण्यात आली.
कार्यक्रमचे प्रमुख अथिति बामनी ग्राम पंचायतचे उपसरपंच सुभाष ताजणे,रूमदेव डेरकर सदस्य संजय गांधी निराधार योजना, समाजसेविका सुशीला पुरेड्डीवार,कल्पना कोकस,नंदिनी पानधाळे,प्रवीण खेडेकर व भाजयुमो महामंत्री घनश्याम बुरडकर प्रमुखाने उपस्थित होते.
या वेळी दिव्यांग बांधव सिद्धार्थ टिपले व प्रशिक राजूरकर यांना व्हीलचेअर तथा ओमप्रकाश बहुरिया व नितीन रमेश गोंधळी यांना आधरकाठी मान्यवरांचा हस्ते वाटप करण्यात आले.
तसेच बामणी कॉर्नर भोजनालय चालवणाऱ्या दोन विकलांग महिला प्रतिभा त्रिपाठी व रंजना दुपारे यांना आर्थिक मदत देण्यात आली.
या प्रसंगी समाजसेविका सुशीला पुरेड्डीवार म्हनाले की आमची महिला टीम ने जीवती येथे शाळेचा मुलींसाठी सॅनिटरी वेंडिंग मशीन, बामणी येथील गरजू झोपडपट्टी लोकांना थंडीच्या दिवसात ब्लॅंकेट वाटप, बल्लारपुर मधील विकलांग आणि बहु विकलांगांना धान्य किट वाटप, प्राथमिक शाळेचा विद्यार्थ्यांना 200 च्या वर शालेय नोटबुक आणि शैक्षणिक किट वाटप व महिला टीमला घेऊन पाचशेच्या वरून वृक्षारोपण करुण पर्यावरण संवर्धन जोपासण्यात आले असे ते या वेळी म्हनाले.
कार्यक्रमात बामनी ग्रामचे असंख्य नागरिक उपस्थित होते.