वरोरा मध्ये शेतकरी प्रशिक्षण व कार्यशाळा कार्यक्रम दि. 21-11-2022 ला.!
भद्रावती (ता.प्र.) - भा. कृ. अनु. प.-केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्यामार्फत केंद्र शासन पुरस्कृत कीटकनाशक प्रतिकार व्यवस्थापन: गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन धोरण या प्रकल्पाअंतर्गत वरोरा येथे शेतकरी प्रशिक्षण व कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर चे वरिष्ठ शास्त्रज्ञ (कीटकशास्त्र) तसेच जिल्हा प्रकल्प समन्वयक डॉ. चिन्ना बाबू नाईक यांनी चालू हंगामातील बीटी कपाशीवर बदलत्या हवामानाच्या परिस्थितीमुळे गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव, बोंड सडणे व बुरशीजन्य रोग या समस्यांमुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आले असल्याचे सांगितले तसेच संस्थेने विकसित केलेले कामगंध सापळे याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या प्रकल्पाची मुख्य कारणे आणि तसेच एकात्मिक व्यवस्थापन याविषयी विस्तृत माहिती दिली आणि शेतकऱ्यांच्या ज्या समस्या होत्या त्यावर त्यांनी चर्चेद्वारे मार्गदर्शन केले. तसेच कीटकशास्त्रज्ञ व जिल्हा प्रकल्प सहसमन्वयक डॉ. टी. प्रभुलिंगा यांनी प्रकल्पाचे स्वरूप, रसशोषक किडींमुळे होणारे नुकसान आणि त्यांचे व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्रशिक्षण समन्वयक श्री. प्रितम कोरे, सहाय्यक प्रकल्प समन्वयक श्री. सुभाष बोबडे व क्षेत्र अधिकारी श्री. मंगेश ठोंबरे (उत्तम कापूस उपक्रम) अंबुजा सिमेंट फाऊंडेशन, चंद्रपूर ह्यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सी. आय. सी. आर. कडून श्री. पराग सहारे (वरिष्ठ संशोधक सहाय्यक), श्री. हरिश मरसकोल्हे (वाय. पी-1.) तसेच अंबुजा सिमेंट फाऊंडेशन कडून श्री. आकाश दुर्शेट्टीवार, श्री. प्रकाश लोखंडे, श्री. प्रदीप पोटे, श्री.विठ्ठल निब्रड, कु. लक्ष्मी माथनकर व कु. भावना रोहनकार (बी.सी.आय) यांनी सहकार्य केले. कार्यक्रम समाप्त झाल्या नंतर तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांना ट्रायकोकार्ड बद्दल माहिती देऊन त्यांचे गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थानाकरिता प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाला वरोरा तालुक्यातील बोर्डा, जामगाव, साखरा, तळेगाव आणि सागरा या गावातील शेतकरी उपस्थित होते.