बल्लारपुर (का.प्र.) - जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत सत्रातील दुसरी पालक शिक्षक सभा दिनांक: 23/11/ 2022 ला दुपारी 3.30 मिनिटांनी पार पडली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. बी. बी. भगत मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे सौ. सुषमा दुर्गे उपाध्यक्ष सौ. वर्षा ठाकरे, श्री. पुरण सिंह, श्री. विवेकानंद लभाने, प्रमुख उपस्थिती श्री. यु. के. रांगणकर सर, श्री एस. एम. चव्हाण सर यांची होती.
प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मंचावर उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.
प्रथमता: सर्वोत्तम घोषणा स्पर्धा मध्ये गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुमारी श्रावणी प्रवीण मत्ते- प्रथम क्रमांक, कुमारी बेनी रामचरण वर्मा- द्वितीय क्रमांक, कुमारी तमन्ना सुनील दिनकर- तृतीय क्रमांक आणि सोहम अमरदिप दुर्गे- प्रोत्साहन पर प्रमाणपत्र आणि गुलाबकळी देऊन गौरविण्यात आले.
आपल्या भाषणात श्री. यु. के. रांगणकर सर यांनी सांगितले की, पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पालकांनी शाळेचे आभार मानले पाहिजे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून आपल्या पाल्यांच्या विकासात शाळेचे योगदान घेण्यासाठी सहकार्य करने गरजेचे आहे. अध्यक्षीय भाषण करताना श्री. बी. बी. भगत सर मुख्याध्यापक यांनी सांगितले की, दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवले पाहिजे, शिक्षण घेणे हा त्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी पालकांनी अत्यंत जागरूक राहणे गरजेचे आहे.
तसेच पालकांनी उपस्थित केलेले स्कूल बस, गृहपाठ आणि दहावीच्या जास्तीच्या वर्गा संबंधी प्रश्नांचे निराकरण मान. श्री. बी. बी. भगत सर मुख्याध्यापक यांनी केले.
पालक शिक्षक सभेत सौ. वर्षा मांदाळे, सौ. सुकेशनी निमकर, सौ. आम्रपाली वेले, श्री. पप्पू महानंद आदी पालक, शिक्षक, श्री. जगदीश कांबळे, श्री. दिनेश भाले बाबू, श्री. वामन बोबडे, श्री. वाल्मीक खोंडे, श्री. सुरेश मोरे, श्री. इंद्रभान अडबाले आदी शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीगण उपस्थित होते.
पालक शिक्षक सभेचे प्रास्ताविक श्री. आर. के. वानखेडे, संचालन सौ. एस. एन. लोधे व आभार प्रदर्शन श्री. एस. एम. चव्हाण यांनी केले. शेवटी विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले.