बल्लारपूर (का.प्र.) - दिनांक २४/११/२०२२ रोजी रात्री विसापूर येथील भिवकुंड येथे स्थित असलेल्या हनुमान मंदिर मधिल मूर्ती तोडण्याच्या घटने विरोधात सर्व बांधवांनी मिळून चक्काजाम करून आंदोलन करण्यात आले व तसेच ज्यांनी हे कृत्य केले त्या आरोपी विरूद्ध २४ तासांचा आत प्रशासन तर्फे कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशी मागणी भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष मोहीत डंगोरे यांच्या तर्फे करण्यात आली व तसेच भाजपा युवा मोर्चा तर्फे बल्लारपूर पोलीस स्टेशन व तहसीलदार साहेब यांना निवेदन ही देण्यात आले.या वेळी शिवाजी चांदेकर जिल्हा सचिव, सुरज चौबे, मनिष राजभर, गणेश महतो, योगेश गोरडवार, राहुल शाह, राजरत्न तीतरे, शारुख शेख, अतीन पाल, नीरज दुबे, राहुल बेंबंसी, विक्की मांझी, निगम दुबे, विक्की भारती या सह अनेक लोक उपस्थित होते.