भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती तालुक्यातील छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय कोंढा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव श्री. रमेशजी पायपरे सर उपस्थित होते. तर प्रमुख अतिथि म्हणून श्री. सुधाकार बतकी सर उपस्थित होते. या कार्यक्रमा मध्ये विद्यार्थ्यांनी महात्मा फुले याचेवर भाषण दिले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. सुधाकर बतकी सर, सौ. वनिता तितरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शेवटी अध्यक्षीय भाषणात श्री रमेशराव पायपरे सर यांनी महात्मा फुले यांच्या बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संचालन श्री. अजय विधाते सर यांनी तर आभार श्री सुधीर आगलावे सर यांनी केले. या कार्यक्रमाला शाळेतील कविश्वर शेंडे सर, सुभाषबाबू पायपरे तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.