बल्लारपूर (का.प्र.) - दिनांक 27/ 11 /2022 वार - रविवार रोजी औरंगाबाद मध्ये महाराष्ट्रातील नवनियुक्त पदधिकारी यांची नियुक्ती व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकचे आयोजन मिर्झा नदीम बेग, (महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष युथ विभाग) व औरंगाबाद जिल्हाध्यक्ष आणि शेख जियाउल्हक (युथ विभाग जिल्हाध्यक्ष औरंगाबाद ) यांनी सभा आयोजित केली होती. त्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष रफिक शेरखान पठाण (राष्ट्रीय महासचिव महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष) होत.
तसेच प्रमुख अतिथी अन्सार पटेल राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच माननीय, अय्युब भाई कच्छी संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सुद्धा आपली उपस्थिती दर्शवली तसेच महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता मा, जितेंद्र मोहरेकर व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा,अजीम शेख व अकोला येथून अकोला जिल्हाध्यक्ष आकाश जंजाळ औरंगाबाद जिल्हाउपाध्यक्ष संजय वाकेकर यांनी सुद्धा आपली उपस्थिती दर्शवली बैठकीत औरंगाबाद सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन तसेच शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले त्यामध्ये.
रहीम खान विदर्भ खानदेश संघटक, मिर्झा इम्रान बेग, जालना जिल्हा अध्यक्ष,अजिम खान जालना उपजिल्हाध्यक्ष, अफसर खान जालना उपतालुका अध्यक्ष युथ विभाग , शेख इम्रान शहर उपाध्यक्ष युथ विभाग,औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अपंग विभाग, साजिद खा पठाण, सिल्लोड तालुकाध्यक्ष अपंग विभाग, शेख कय्युम तसेच औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष युथ विभाग मुज्जामिल शेख सिल्लोड तालुकाध्यक्ष युथ विभाग सय्यद अजमत अली,औरंगाबाद जिल्हा सदस्य पदी गुफारान पठाण, साजेद पठाण व सय्यद अजगर अली यांना सुद्धा नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
औरंगाबाद जिल्हाध्यक्ष व्यापारी विभाग कैसर खान, व पैठण तालुकाध्यक्ष युथ विभाग आदेश भाऊ या दोन्ही नवीन पदाधिकाऱ्यांची बैठकीत नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. समाजसेवक मिर्झा तोफीक बेग व न्यू जनता हॉटेल संचालक नफिस सौदागर यांचेही शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
सूत्रसंचालन शेख जियाउल्हक यांनी केले तसेच तसेच प्रमुख अतिथी अन्सार पटेल यांनी आपले मत व विचार सभेत मांडले व मार्गदर्शन केले.रफिक शेरखान पठाण यांनी सुद्धा आपले विचार व फोरम व सर्व सामान्य पर्यंत कसे आपले फोरम मदत करेल याचे मार्गदर्शन केले.आभार प्रदर्शन मिर्झा नदीम बेग यांनी केले.