बल्लारपुर (का.प्र.) - भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ता आणि माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवारजींच्या विचाराने सक्रिय कार्यकर्ता अहोरात्र निःस्वार्थ पणे काम करणारे, अशा कार्यकर्त्याची आर्थिक परिस्थिती बिघडली अशातच आपल्या सक्रिय कार्यकर्त्याची ही बाब भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेते श्री. राजीव भाऊ गोलीवार जी यांना कळली. त्यांनी तातडीने या गोष्टीची दखल घेत माननीय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार जी यांना कळविली. त्यांनी तातडीने या गोष्टीची दखल घेत बल्लारपूर मधील श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर यांना कळविली. फॅन्स क्लब नी त्वरित याची दखल घेत. आपल्या कार्यकर्त्याचा घरी जाऊन किराणा, भाजीपाला आणि एक छोटीशी आर्थिक मदत केली. तसेंच माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवारजिंनी आपल्या कार्यकर्त्याला कळविले कि, कोणत्याही गोष्टीची आवश्यकता राहिली तर मी तुमच्या पाठीशी उभा आहे.
या मदत कार्यात श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर जी, कैलाश गुप्ता जी, सुधाकर सिक्का जी, रिंकू गुप्ता जी उपस्थित होते.