बल्लारपुर (का. प्र.) - राजलक्ष्मी प्रोडक्शन व जी.आर.फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित नि:शब्द मराठी टेलीफिल्म चे शुटींग संपन्न. गोगाव येथील स्वर्गीय पुष्पाताई काशीराम चडगुलवार यांचे स्मृती प्रित्यर्थ सुनील काशीराम चडगुलवार लिखित,निर्मित व गणेश रहिकवार - दिग्दर्शीत, चित्रित, संकलित फिल्म निःशब्द चा मुहूर्त सौ.निर्मलाताई सुनिल चडगुलवार यांचे शुभहस्ते संपन्न झाला. या टेलीफिल्म चे संपूर्ण पोस्ट प्रोडक्शन चे कार्य स्टूडियो ॐ साईं क्रिएशन मध्ये होत आहे.
गडचिरोली येथील स्थानिक कलाकारांना सोबत घेऊन व गडचिरोली शहरातील परिसरात या टेलीफिल्म चे शुटींग पुर्ण करण्यात आले. टेलिफिल्म मध्ये झाडिपट्टीतील जेष्ठ कलावंत सुनिल चडगुलवार, नंदीनी बिके, मनिषा मडावी, मुन्ना बिके, जितेंद्र उपाध्याय, प्रकाश लाडे, विवेक मुन, राकेश मारबते, विनोद मारकवार, जगदिश मडावी, बालकलाकार कु.राजलक्ष्मी चडगुलवार, साई मडावी, भास्कर मेश्राम, पुष्पलता कुमरे, कवडुजी कुमरे, दामजी नैताम, देवेंद्र दहीकर, रघुनाथ बोरकुटे, लतिफ पठाण यांनी अभिनय केलेला आहे. सदर टेलिफिल्म ही सामाजिक विषयांवर आधारित असुन जानेवारी २०२३ मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती लेखक निर्माता सुनिल चडगुलवार यांनी दिलेली आहे.