शिंदे विद्यालयात आनंद मेला साजरा.!

भद्रावती (ता. प्र.) - भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे ग्राहक दिनाचे औचित्य साधून यशवंतराव शिंदे विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आनंद मेल्याचे आयोजन करण्यात आले. 
शिंदे विद्यालयात आयोजित आनंद मेल्याच्या उद्घाटन सोहळ्याला अध्यक्ष प्राचार्य , डॉ. जयंत वानखेडे तर उद्घाटक प्राध्यापक डॉ. कार्तिक शिंदे, सचिव, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती यांच्या हस्ते पार पडले.
या आनंद मेळ्याला उद्घाटक डॉ. कार्तिक शिंदे सरांनी मार्गदर्शन करताना "विद्यार्थ्यांना खरी कमाई काय असते, ती अशा आनंदमेळातून सुरुवात होते " असे सांगितले.
तर प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे यांनी अध्यक्ष भाषणातून "व्यवहार ज्ञान अशाच कार्यक्रमातून निर्माण होत असते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमात सहभागी व्हावे" असे सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयीन शिक्षक श्री ए. एम. देशमुख  व यु. एस . पाटील यांनी केले होते. या आनंदमेळामध्ये तब्बल 22 विद्यार्थ्यांनी  खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल लावले होते.  यामध्ये समोसा, मोमोज, पाणीपुरी ,कच्चा चिवडा, फिंगर या पदार्थांच्या स्टॉलवर विद्यार्थ्यांची जास्तच गर्दी दिसत होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले. विशेष म्हणजे आनंद मेला या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मनमुराद खाण्याचा आस्वाद घेतला. काही तासामध्ये खाण्याचे सर्व पदार्थ बघता बघता संपून गेले . कार्यक्रमाचे शेवटी खाद्यपदार्थ विकणाऱ्या मुलांचे कौतुक करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.