भद्रावती (ता. प्र.) - ग्राहक जागृती मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी दि. १९ डिसेंबरला ग्राहक पंचायत, भद्रावतीच्या चमुने शहरातील सर्व मिठाई फरसाण दुकानांचे निरिक्षण केले.
शहरातील नारायण स्विट्स, माॅं लक्ष्मी बिकानेर मिठाईवाला, ऐ. के फूड काॅर्नर, चंद्रप्रभू उपहार गृह, राजकोट स्विटी मार्ट, जैन कॅन्टीन, गुरूकृपा जैन कॅन्टीन, साई बिकानेर मिठाई असे एकुण सात दुकानांचे तसेच स्वयंपाक घराचे निरिक्षण करण्यात आले. मिठाई, फरसाण दुकानांचे निरिक्षण करतांना खाद्य व सुरक्षा मानक (fssai) विभागाचा परवाना, वजनमापे विभागाचे प्रमाणपत्र, स्वयंपाक घर स्वच्छ आहे का? यांचे निरिक्षण करण्यात आले. विक्रीस ठेवलेल्या खाद्य पदार्थांवर पदार्थ तयार करण्याची तारीख, वापरण्याचा कालावधी, मिठाईचे वजन करताना वेष्टणाचे वजन मिठाई सोबत वजनात धरु नये, मिठाई उघड्यावर ठेऊ नये, भावफलक दर्शनी भागावर लावावा, मिठाई हाताळताना मिठाई ला हाताचा स्पर्श होऊ नये त्यासाठी हॅण्ड ग्लोव्हज वापरावे आणि काही दुकानदारांनी दुकानांच्या समोर फुटपाथवर खाद्य पदार्थ बनवित असल्याचे निदर्शनास आले असता त्यांना खाद्य पदार्थ त्यांच्या स्वयंपाक घरातच बनवा अशा सुचना सर्व दुकानदार आणि स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तींना करण्यात आल्या तसेच सर्व दुकानदारांना सुचना पत्र दिले. दिलेल्या सुचनांची लवकरात लवकर परिपुर्तता करावी असे सांगण्यात आले.
शहरात ग्राहक जागृती मोहिमेचे नागरिकांकडुन कौतुक होत आहे. या मोहिमेमुळे ग्राहकांना ग्राहकांच्या अधिकाराची माहीती होत असल्यामुळे भद्रावती शहरातुन ग्राहक पंचायत भद्रावती चे आभार व्यक्त केले जात आहे. जागो ग्राहक जागो, ग्राहक जागृती मोहिमेला मिठाई फरसाण दुकानांचे निरिक्षण वामन नामपल्लीवार, वसंत वर्हाटे, अशोक शेंडे, प्रविण चिमुरकर, गुलाब लोणारे, केशव मेश्राम, दांडेकर, सातपुते यांनी केले.