भद्रावती (ता. प्र.) - जिल्हा स्टेडियम चंद्रपूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती चे चार बॉक्सर जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत विजय संपादित करून विभागीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झालेली आहे .
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील 17 वर्षे वयोगटाखालील मुलांमध्ये महेश आडे , महेश खोब्रागडे व मुलींमध्ये मानशी चव्हाण यांची विभागावर निवड झाली आहे.
19 वर्षे वयोगटाखालील मुलींमध्ये कुमारी देवयानी चव्हाण हिने जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत नैपुण्य दाखवत विभागावर निवड झाली आहे. यांना बॉक्सिंग कोच लता इंदुरकर ,विजय ढोबळे , क्रीडा शिक्षक रमेश चव्हाण सर यांचे मार्गदर्शन लाभले.
जिल्हास्तरावर विजय होऊन बॉक्सिंग स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड झालेल्या खेळाडूंचा भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ. विशाल शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे , क्रीडा शिक्षक रमेश चव्हाण, किशोर ढोक, डॉ. ज्ञानेश हटवार ,शेखर जुमडे, समस्त प्राध्यापक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले . विभागीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.