क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयात संत गाडगेबाबांना अभिवादन .!
वणी (वि.प्र.) - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय, येथे अज्ञान, अस्वच्छता व अंधश्रद्धा यांनी बुरसटलेल्या समाजाचा विकास करण्याचे व्रत हाती घेऊन कीर्तनासारखे प्रभावी माध्यम वापरून समाज सुधारण्याचे कार्य करणारे संत गाडगे महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला वाचनालयातील नियमित वाचक कु.संजीवनी झाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. सहा. ग्रंथपाल शुभम कडू यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवन चरित्राबद्दल माहिती वाचकांना दिली. यावेळी वाचनालयात वाचक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.