जिल्हा स्तरीय तायकांदो स्पर्धा भद्रावतीत संपन्न.!

भद्रावती (ता.प्र.) - जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपुर, जिल्हा परिषद चंद्रपूर व चंद्रपुर जिल्हा तायकादों असोसिएशनच्या सयुक्त विद्यमाने भद्रावती येथील नीळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय इंडोर सभागृहात नुकतेच संपन्न झाले. जिल्हा स्तरीय शालेय तायकांदो स्पर्धेत 14 वर्ष, 17 वर्ष, 19 वर्ष खालील मुले  मुलींचा ग्रामीण शालेय तसेच म.न.पा. चंद्रपुर शालेय जिल्हास्तरीय तायकादों स्पर्धा व निवड चाचणी घेण्यात आलीत. विविध वजन गटात शालेय खेळाडूंची निवड करण्यात आली. सदर कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी चंद्रपुर जिल्हा तायकादों असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विशाल शिंदे व सचिव सतीश खेमस्कर, प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, प्रा. रमेश चव्हाण (क्रीडा शिक्षक), प्रा. माधव केंद्रे, प्रा. किशोर ढोक, डॉ. ज्ञानेश हटवार, श्री. आजिज शेख, श्री. संतोष कडापेवाले (क्रीडा शिक्षक), संपूर्ण चंद्रपुर जिल्हा तायकादों असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. 
डॉ. विशाल शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून भविष्यात संघटनेच्या माध्यमातून या खेळाला लागणारे साहित्य हे आम्ही उपलब्ध करून देऊ व या खेळाचा प्रसार चंद्रपुर व गडचिरोली जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात वाढविण्याकरिता प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन केले. निवड झालेल्या खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्यात.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.