मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या बोधचिन्हाचे, संकेतस्थळाचे अनावरण सोहळा.!
मुंबई (जगदीश का. काशिकर) - ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष’ आणि ‘डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन’ च्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या वैद्यकीय सेवा सन्मान सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष’ तसेच ‘डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन’च्या सर्व टीमचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी वैद्यकीय कक्षाच्या पाच वर्षाच्या कामगिरीचा अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या बोधचिन्हाचे, संकेतस्थळाचे आणि टोल फ्री नंबरचे अनावरण देखील यासमयी करण्यात करण्यात आले.
डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून राज्यभरातील गोरगरीब, गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत मिळत आहे. कोरोनाच्या संकटकाळात कक्षाने महाराष्ट्राबरोबरच महाराष्ट्राबाहेरही वैद्यकीय मदत पुरवण्याचे कार्य केले आहे. केरळ तसेच महाराष्ट्रातील महाड, चिपळूण, कोल्हापूर, सांगली येथे आलेल्या पूर परिस्थितीत कक्षाच्या माध्यमातून मदत केल्याचे सांगून याप्रसंगी मुख्यमंत्री महोदयांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष’ तसेच ‘डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन’च्या सर्व टीमचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रा.राम शिंदे, धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन, वैद्यकीय कक्षाचे समन्वयक व अध्यक्ष मंगेश चिवटे, एबीपी वाहिनीचे संपादक राजीव खांडेकर आणि ज्येष्ठ पत्रकार राजा माने, गणेश शिंदे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष’ आणि ‘डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन’ चे पदाधिकारी, सहाय्यक सहकारी उपस्थित होते.