भद्रावती (ता. प्र.) - भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील विविध क्रीडा स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या क्रीडापटूंना भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे सचिव डॉ. कार्तिक शिंदे यांच्या हस्ते क्रीडा किडचे वाटप करण्यात आले.
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील ज्या खेळाडूंनी तालुकास्तरावर व जिल्हा स्तरावर आपल्या खेळातील नैपुण्य दाखवत पुढील स्पर्धेसाठी ज्यांनी आपले नामांकन केले , अशा सगळ्या खेळाडूंना भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती यांच्यातर्फे क्रीडा किडचे वाटप करण्यात आले.
सचिव डॉ. कार्तिक शिंदे यांच्या हस्ते खेळाडूंना कीडचे वाटप करण्यात आले . विजय खेळाडूंना मार्गदर्शन करताना डॉ. कार्तिक शिंदे यांनी आपल्या महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात तसेच क्रिडा क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केले आहे. क्रिडा कीटच्या रूपाने आपणाला एक नवीन ऊर्जा प्राप्त झालेली आहे. या ऊर्जेचा वापर आपण पुढील स्पर्धेसाठी करावा. विजय संपादन करण्यासाठी आपण आपले खेळातील कौशल्य दाखवावे, असे सांगितले.
सदर क्रिडा किडचे वाटप करताना मंचावर डॉ. कार्तिक शिंदे, प्राचार्य डॉ.जयंत वानखेडे, प्राध्यापक डॉ. सुधीर मोते , डॉ. ज्ञानेश हटवार, भीष्माचार्य बुरकुटे हे ऊपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक रमेश चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक किशोर ढोक यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा प्रेमी रोडे, अजीज शेख तसेच खेळाडू यांनी परीश्रम घेतले. मैदानात समस्त खेळाडू उपस्थित होते.