शिक्षक भारती चा जिल्हा मेळावा 4 डिसेंबरला..!
भद्रावती (ता.प्र.) - शिक्षक आमदार कपिल पाटील हे 4 डिसेंबर ला आयोजित शिक्षक भारतीच्या चंद्रपूर जिल्हा मेळाव्याला उपस्थित राहून शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. चंद्रपूर जिल्हा शिक्षक भरती संघटनेच्या वतीने 4 डिसेंबर 2022 रोज रविवारला दुपारी 11.30 वाजता सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर च्या सभागृहात जिल्हास्तरीय शिक्षक मेळाव्याचे आयोजन केलेले आहे.
या शिक्षक मेळाव्याला शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी आमदार कपिल पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार किशोर भाऊ जोरगेवार चंद्रपूर, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विजय देवताळे,अध्यक्ष ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ वरोरा तथा संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून मा. एडवोकेट वामनराव चटप, प्रशांत पोटदुखे, संदीप गड्डमवार, जिनेश भाई पटेल,केशवजी जेनेकर हे अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.चंद्रपूर येथे होणाऱ्या या शिक्षकांच्या मेळाव्याला शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष तथा नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे शिक्षक भारतीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र झाडे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमानंतर सगळ्यांचे निवेदन स्वीकारण्यात येणार आहेत.
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या या जिल्हास्तरीय शिक्षक मेळाव्याला शिक्षक आमदार कपिल पाटील यांचे " शासनाचे घातक शिक्षण विषयक धोरण व शिक्षकांवरील अन्याय " या विषयावर शिक्षकांसोबत संवाद साधणार आहेत. या मेळाव्यात शिक्षक भारती संघटनेचे विभागीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील समस्त शिक्षक बंधू , भगिनींनी या शिक्षक मेळाव्याला उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षक भारती संघटना जिल्हा चंद्रपूरचे अध्यक्ष भाष्कर बावणकर, डॉ. ज्ञानेश हटवार , कार्याध्यक्ष पुरुषोत्तम टोंगे, कार्यवाह राकेश पायताडे, शहर अध्यक्ष किशोर दहेकर, गंगाधर खिरटकर तथा जिल्हा व तालुक्याचे पदाधिकारी यांनी केले आहे.